Advertisement

राज्यात कोरोनाचा चौथा बळी, मुंबईत ६५ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू

मंगळवारी मुंबईत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

राज्यात कोरोनाचा चौथा बळी, मुंबईत  ६५ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू
SHARES

कोरोना विषाणूचा राज्यातील बळींचा आकडा आता 4 वर गेला आहे. मंगळवारी मुंबईत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. 

मृत्यू झालेला इसम १५ मार्च रोजी यूएईहून भारतात आला होता. प्रथम तो अहमदाबादेत आला व नंतर मुंबईत आला होता. ताप, खोकला व श्वसनाच्या त्रासामुळं या व्यक्तीला २३ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला उच्च रक्तदाब आणि डायबेटिसचा विकारही होता. कोरोनाची लक्षणं असल्यानं त्याची तातडीनं चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावत जाऊन मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. 

राज्यात आज पुन्हा 4 नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. पुण्यात तीन तर साताऱ्यात एक करोना रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १०१वर पोहोचली आहे. राज्याच्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळल्याने काळजी वाढली आहे.

पुण्यात करोना बाधीत नव्याने तीन रुग्णांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यातील दोघे खासगी हाॅस्पिटलमध्ये तर एकाला महापालिकेच्या डाॅ. नायडू हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. डाॅ. नायडू हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट असलेला तरूण हा परदेशातून आला असून इतर दोघांना परदेशात गेल्याची हिस्ट्री नाही. त्यामुळे ते कोणाच्या संपर्कात आले याची माहिती महापालिका प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.  मुंबईत आतापर्यंत ४१, पुणे १९, पिंपरी-चिंचवड १२, नागपूर ४, यवतमाळ ४, कल्याण ४, नवी मुंबई ४, सांगली ४, नगर २, सातारा २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.


हेही वाचा -

१०वी-१२वीच्या उत्तरपत्रिका शिक्षक घरीच तपासणार

Corona Virus : जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा