Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ६७ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) ६७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ६७ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) ६७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच कळंबोली येथील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ८, नवीन पनवेल २, खांदा काॅलनी ४, कळंबोली ४, कामोठे १३, खारघर ३४, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १२, कळंबोली १७ कामोठे १०, खारघर २४, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४३३५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३३१९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४५२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा -

राज्यभरात फटाकेबंदीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाकडून अमान्य

कोविशील्‍ड लसीची अंतिम चाचणी लवकरच, सीरमकडून घोषणा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा