Advertisement

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ६९ रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी (८ जानेवारी) कोरोनाचे नवीन ६९ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ६९ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत शुक्रवारी (८ जानेवारी) कोरोनाचे नवीन ६९ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार ५९२ झाली आहे. 

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १५, नेरुळ ७, वाशी १२, तुर्भे ४, कोपरखैरणे ७, घणसोली ३, ऐरोली येथील २१ रुग्णांचा समावेश आहे. तर ७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १७, नेरुळ १९, वाशी ९, तुर्भे ४, कोपरखैरणे ८,  घणसोली ८, ऐरोली १२, दिघा येथील १ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९,५७९ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०६७ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ९४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डिसेंबर महिन्यात चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात ७२,७७१ चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात वाढ करीत डिसेंबर महिन्यात ८०,६२४ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत एकूण ५१,००२ कोरोना रूग्ण आढळले असून त्यापैकी ४९,०६० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व १०५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे ९६.१९ % आणि मृत्यूदराचे २.०६ % हे प्रमाण इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत चांगले आहे.



हेही वाचा -

पोलिस भरतीचा जीआर अवघ्या काही तासात रद्द

MPSC च्या परीक्षा जाहीर; शुक्रवारी तारखा जाहीर होण्याची शक्यता



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा