Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ६९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (१८ डिसेंबर) ६९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ४५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ६९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (१८ डिसेंबर) ६९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ४५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच पनवेलमधील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ९  नवीन पनवेल २४, खांदा काॅलनी १०, कळंबोली ४, कामोठे १०, खारघर १०, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ११, नवीन पनवेल ७, कळंबोली ५, कामोठे ८, खारघर येथील १४ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७०२६ कोरोना रूग्णांपैकी २६११७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५९१ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३१८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

पहिले लसीकरण केंद्र कूपर रुग्णालयात

समुद्र पर्यटनाची मजा वाढणार, ‘बीच शॅक’ धोरणाला मंजुरी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा