Advertisement

चेंबूरमध्ये अाढळले डेंग्यूचे ७ रुग्ण


चेंबूरमध्ये अाढळले डेंग्यूचे ७ रुग्ण
SHARES

मुंबईत पावसाने अजून नीट हजेरी लावलेली नसतानाच डेंग्यूने मुंबईत शिरकाव केला आहे. चेंबूरमध्ये डेंग्यूचे ७ रुग्ण अाढळले असून झेन या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. यापैकी एका रुग्णाला घरी सोडण्यात अालं अाहे.  


डेंग्यूची लक्षणं

चेंबूरमधील झेन रुग्णालयातील डॉ. विक्रांत शाह म्हणाले, ''डेंग्यू झाल्याचे तीव्र तापाद्वारे समजते. डेंग्यू झालेल्या रुग्णाच्या अंगातील पाण्याची पातळीदेखील कमी होते. इडिस डासाच्या संसर्गाने डेंग्यू होतो. यामध्ये बोन रॅकिंग फिवर म्हणजेच तीव्रज्वर होतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप, सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप'', असंही म्हणतात.


डेंग्यूचे भयावह रूप 

डेंग्यूवर उपचारास उशीर झाल्यास डेंग्यू अंतिम टप्प्यात येतो याला "डेंग्यू शॉक सिन्ड्रोम" असे म्हणतात . हा टप्पा सर्वात भीतीदायक असतो. कारण यात रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

वाचण्यासाठी उपाय

  • डेंग्यूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वप्रथम आपलं घर स्वच्छ ठेवावं.
  • झाडाच्या कुंड्या, ड्रम, निकामी झालेले टायर्स यांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होते. त्यामुळे साठवलेले पाणी झाकण लावून बंद करावे.
  • घरात कापूराचा धूर करावा जेणेकरू डास कापराच्या वासाने घरात शिरकाव करत नाहीत.



हेही वाचा -

पावसाळ्यात त्वचेची 'अशी' घ्या काळजी !

घरातील स्वच्छता, शारीरिक दुर्बलतेवर होणार पाहणी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा