Advertisement

मुंबईत ७५० कंटेन्मेंट झोन, 'इतक्या' इमारती सील

धारावी, भायखळा, वांद्रे, खार, माटुंगा हे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या विभागात रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे.

मुंबईत ७५० कंटेन्मेंट झोन, 'इतक्या' इमारती सील
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत ७५० कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) असून ५८७५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

धारावी, भायखळा, वांद्रे, खार, माटुंगा हे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या विभागात रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. येथील रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ होत आहे. तर काही विभागात सुरुवातीला कमी असलेल्या अंधेरी, दहिसर, मालाड, बोरीवली, कांदिवली, गोरेगाव, भांडुप, ग्रॅन्टरोड या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे.

मुंबईत ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण सापडले असतील त्या विभागात कंटेन्मेंट झोन जाहीर करून सुरक्षा कडक केली जाते. मुंबईतील धारावी व इतर काही विभागात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश येते आहे. जेथे कोरोना आटोक्यात आला आहे, त्या भागातील कंटेन्मेंट झोन काढून टाकून तेथील सुरक्षा कमी केली जाते.

जेथे सर्वाधिक रुग्ण आहेत व तेथील आकडेवारी रोज वाढते आहे, अशी ठिकाणे रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. संसर्ग रोखण्यासाठी अशा ठिकाणी बाहेरील व्यक्तीस प्रवेश करण्यास मज्जाव आहे. तेथील बाजार इतर ठिकाणी हलवण्यात आले असून परिसर लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच पोलिस बंदोबस्तही मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात आला आहे.हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार
संबंधित विषय
Advertisement