Advertisement

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ७९ रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी (२० जानेवारी) कोरोनाचे नवीन ७९ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ७९ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत बुधवारी (२० जानेवारी) कोरोनाचे नवीन ७९ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५२ हजार ३७५ झाली आहे

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर २१, नेरुळ ११, वाशी १२, तुर्भे ५, कोपरखैरणे ९, घणसोली ६, ऐरोली येथील १५ रुग्णांचा समावेश आहे. तर ४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १३, नेरुळ ७, वाशी ४, तुर्भे ३, कोपरखैरणे ६,  घणसोली ३, ऐरोली  ८, दिघा  येथील १ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०,४०८ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७७ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबईतील ३१३ जणांना लस देण्यात आली होती. हे सर्वजण लसीकरणानंतर ठणठणीत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला असून यातील तीन जणांना काही काळ लस टोचल्याच्या ठिकाणी दुखणे जाणवले असून काही प्रमाणात अस्वस्थता जाणवली होती. आठवडय़ात मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी लसीकरण करण्यात येणार आहे. गुरुवारी लसीकरण होणार नाही. 

पुढील काही दिवस दिवसाला चारशे जणांना लस देण्याचे नियोजन आहे. मात्र यातील काही जण बाहेरगावी आहेत, तसेच काहींना शारीरिक त्रास असल्याने कमी जणांचे लसीकरण होत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.



हेही वाचा -

आस्थापना पाठोपाठ सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक

जे.जे. रुग्णालयात दिवसभरात १०० पैकी केवळ १३ जण लसीकरणास हजर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा