Advertisement

दादरच्या वन रुपी क्लिनिकमध्ये ८ महिन्यांच्या गर्भवतीची सुखरूप प्रसूती


दादरच्या वन रुपी क्लिनिकमध्ये ८ महिन्यांच्या गर्भवतीची सुखरूप प्रसूती
SHARES

दादरच्या वन रुपी क्लिनिकमध्ये एका ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली आहे. ज्योती पवार असं या महिलेचं नाव असून सकाळी त्या कळवा ते दादर असा प्रवास करत होत्या. दरम्यान दादरला आल्यावर त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना दादरच्या वन रुपी क्लिनिकमध्ये नेण्यात आलं. 

यावेळी वन रुपी क्लिनिकमध्ये ड्यूटीवर असलेल्या डॉ. रावल आणि त्यांच्या असिस्टंटने ज्योती यांना वैद्यकीय सुविधा दिली. पण, ज्योती यांनी तेव्हाच एका बाळाला सुखरूप जन्म दिला. सकाळी १०. ३० वाजता ज्योती यांची प्रसुती करण्यात आली. ज्योतीच्या बाळाचं वजन ३ किलो असून आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.‌


६ महिन्यांतील ही तिसरी प्रसुती आहे. वन रुपी क्लिनिकने आतापर्यंत आपतकालीन परिस्थितीत उत्तम कामगिरी केली आहे. वन रुपी क्लिनिकचे ऑन ड्यूटी डॉ. रावल यांनी जीआरपी रेल्वे पोलिस यांच्या सहाय्याने ही प्रसूती सुखरुप झाली. नैसर्गिक प्रसूती करता बराच कालावधी होता. पण तरीही या महिलेला प्रसूती वेदना आधीच सुरू झाल्याने ही प्रसूती करण्यात आली. आता या महिलेला केईएम रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. 

- डॉ. राहुल घुले , वन रुपी क्लिनिकचे प्रमुख

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा