Advertisement

दिलासा, राज्यात सोमवारी कोरोनाचे नवे ८ हजार १२९ रुग्ण

राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

दिलासा, राज्यात सोमवारी कोरोनाचे नवे ८ हजार १२९ रुग्ण
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) सोमवारी नवीन कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात  दिवसभरात ८ हजार १२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १४ हजार ७३२  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच २०० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ५९,१७,१२१ (१५.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४९,२५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ५,९९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ३५४ झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १९ हजार ०४७ आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार २०५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १५ हजार ६८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार १५६ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६ हजार २६१ आहे. 

नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ३५७ तर अहमदनगरमध्ये ४ हजार ५९२आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ७१४, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ३७२ इतकी आहे. जळगावमध्ये ३ हजार ०१७, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार १९६ सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या १ हजार ५९४ इतकी आहे. सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात ४७ इतकी आहे.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

१     मुंबई मनपा ५३०

२     ठाणे  ७२

३     ठाणे मनपा ७१

४     नवी मुंबई मनपा  ७१

५     कल्याण डोंबवली मनपा  ४१

६     उल्हासनगर मनपा ७

७     भिवंडी निजामपूर मनपा ८

८     मीरा भाईंदर मनपा ५५

९     पालघर     १६७

१०    वसईविरार मनपा  ७०

११    रायगड     २५६

१२    पनवेल मनपा     १०९

ठाणे मंडळ एकूण  १४५७

१३    नाशिक     २१६

१४    नाशिक मनपा    ३९

१५    मालेगाव मनपा   २

१६    अहमदनगर ४२९

१७    अहमदनगर मनपा १५

१८    धुळे  ३३

१९    धुळे मनपा  १४

२०    जळगाव    २७

२१    जळगाव मनपा    ८

२२    नंदूरबार    ४

नाशिक मंडळ एकूण     ७८७

२३    पुणे  ४६०

२४    पुणे मनपा  २६१

२५    पिंपरी चिंचवड मनपा    १५१

२६    सोलापूर    ३२२

२७    सोलापूर मनपा    ११

२८    सातारा     ५९९

पुणे मंडळ एकूण  १८०४

२९    कोल्हापूर   ८१०

३०    कोल्हापूर मनपा   ३२१

३१    सांगली     ६६६

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा   ९५

३३    सिंधुदुर्ग    ४७८

३४    रत्नागिरी   ६५७

कोल्हापूर मंडळ एकूण   ३०२७

३५    औरंगाबाद   १०९

३६    औरंगाबाद मनपा  १२

३७    जालना     ३०

३८    हिंगोली     १९

३९    परभणी     २२

४०    परभणी मनपा    ५

औरंगाबाद मंडळ एकूण  १९७

४१    लातूर ९९

४२    लातूर मनपा ४

४३    उस्मानाबाद ८३

४४    बीड  १५८

४५    नांदेड ६१

४६    नांदेड मनपा २८

लातूर मंडळ एकूण ४३३

४७    अकोला     २३

४८    अकोला मनपा    ५२

४९    अमरावती   ७०

५०    अमरावती मनपा  १३

५१    यवतमाळ   ६४

५२    बुलढाणा    ४९

५३    वाशिम     ३८

अकोला मंडळ एकूण    ३०९

५४    नागपूर     १०

५५    नागपूर मनपा    २२

५६    वर्धा  ४

५७    भंडारा १९

५८    गोंदिया     ३

५९    चंद्रपूर २५

६०    चंद्रपूर मनपा ६

६१    गडचिरोली  २६

नागपूर एकूण     ११५



हेही वाचा -

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? ८ दिवसात होणार निर्णय

सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा