Advertisement

८२ वर्षीय महिलेची कोरोनावर मात

देशात 60 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. मात्र, मुंबईतील 82 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली आहे.

८२ वर्षीय महिलेची कोरोनावर मात
SHARES

देशात 60 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. मात्र, मुंबईतील 82 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली आहे. पश्चिम उपनगरात राहणारी एक ८२ वर्षीय ही वृद्ध महिला पूर्णपणे बरी होऊन आपल्या घरी परतली आहे. कोकिलाबेन हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये ही महिला आठवडाभर होती. त्यानंतर बरी होऊन ती आपल्या घरी परतली. 

केरळमध्येही वयाची नव्वदी ओलांडलेल्या एका जोडप्याला कोरोनाची लागण झाली होती. हे जोडपे सुद्धा या आजारातून पूर्णपणे बरे झाले. वृद्धांच्या तुलनेत तरुणांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे. त्यामुळे करोनामधून त्यांचे बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईतील वृद्धेच्या मुलाने याबाबत सांगितलं की, आमच्या आईचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण तिच्यामध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे आढळली नव्हती. ती गुजरातला गेली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही तिची चाचणी केली. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच, आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले. आता तिची प्रकृती सुधारत आहे.

मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले ८१ ते ९० वयोगटातील १२ रुग्ण आहेत. बुधवारी ९० ते १०० वयोगटातील फक्त एका व्यक्तीला करोनाची लागण झाली. ८२ वर्षीय वृद्ध महिलेचे कोरोनामधून बरे होणे आमच्यासाठी आशेचा किरण आहे. कोरोना व्हायरस म्हणजे वृद्धांसाठी फक्त मृत्यू नाही. या केसने आम्हाला आत्मविश्वास दिला असं कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरने सांगितलं.



हेही वाचा -

Coronavirus Updates: दक्षिण मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २५० वर

राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा