Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ८३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ( २४ नोव्हेंबर) ८३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी  ८३ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ( २४ नोव्हेंबर) ८३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघर आणि तोंडरे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २१, नवीन पनवेल १०,  खांदा काॅलनी ७, कळंबोली २, कामोठे १०, खारघर ३२, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ३, नवीन पनवेल २, कळंबोली २, कामोठे ८, खारघर १५, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४९६९ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३८४९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ५४५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा -

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे

महाराष्ट्र : २०२० मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णयRead this story in हिंदी
संबंधित विषय