Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ९१ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) ९१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १४३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ९१ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) ९१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १४३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कामोठ्यातील २ आणि खांदा कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १४, नवीन पनवेल ६, खांदा काॅलनी २, कळंबोली ८, कामोठे २१, खारघर ३९, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ११, नवीन पनवेल ३३, कळंबोली २४, कामोठे ३०, खारघर ४२ तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २२८७० कोरोनाबाधित रूग्णांपैकी २१३६८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५३१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ९७१ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा -

मुंबईत कोरोनाच्या १४ लाख चाचण्यांचा टप्पा पार

खाजगी सुरक्षारक्षकांना लोकलने प्रवासाची परवानगीRead this story in हिंदी
संबंधित विषय