Advertisement

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे ९४ नवे रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे नवीन ९४ रुग्ण आढळले. तर एक जणाचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे ९४ नवे रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे नवीन ९४ रुग्ण आढळले. तर एक जणाचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत १६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,४७३ झाली आहे. यामध्ये १३५८  रुग्ण उपचार घेत असून ४८,१०५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व १६, कल्याण प ३९, डोंबिवली पूर्व २१,  डोंबिवली प १५, मांडा टिटवाळा १,  तर मोहना येथील २ रूग्णांचा समावेश आहे.  

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १० रुग्ण टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून तर इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.हेही वाचा-

मुंबईतील फेरीवाल्यांचं पुन्हा सर्वेक्षण 

आशा स्वयंसेविकांना राज्य सरकारकडून दिवाळीची भेट, 'इतका' वाढीव मोबदला मिळणार Read this story in हिंदी
संबंधित विषय