Advertisement

कोरोनाचे 94 टक्के मृत्यू फक्त 8 राज्यात

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 1 लाख 90 हजारांच्यावर गेला आहे. विशेष म्हणजे यापैकी 1 लाख 29 हजार 21 कोरोनाचे रुग्ण हे फक्त 7 राज्यात आहेत.

कोरोनाचे 94 टक्के मृत्यू फक्त 8 राज्यात
SHARES

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 1 लाख 90 हजारांच्यावर गेला आहे. विशेष म्हणजे यापैकी 1 लाख 29 हजार 21 कोरोनाचे रुग्ण हे फक्त 7 राज्यात आहेत. तर कोरोनामुळे  देशभरात मृत्यू पावलेल्यांपैकी 94 टक्के मृत्यू हे फक्त 8 राज्यात झाले आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या रोज वेगाने वाढत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये कोरोनाचा जास्त प्रसार असल्याचं दिसून आलं आहे. तर, काही राज्यांनी हा संसर्ग रोखण्यात यश मिळवल्याचं दिसून येत आहेत.

राज्यानुसार रुग्णांची संख्या

  • महाराष्ट्र - 67 हजार 655
  • तामिळनाडू - 22 हजार 333
  • दिल्ली - 19 हजार 844
  • गुजरात – 16 हजार 779
  • राजस्थान – 8 हजार 831
  • मध्यप्रदेश – 8 हजार 89
  • उत्तरप्रदेश – 7 हजार 823

देशाच्या रुग्णसंख्येत  महाराष्ट्राचा वाटा 35.50 टक्के आहे. तर मुंबईचा वाटा 20.82 टक्के आहे. तर कोरोनाचे सर्वाधिक बळी महाराष्ट्रात गेले आहेत. देशातील 5 हजार 394 मृतांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 2 हजार 286 तर गुजरातमध्ये 1 हजार 38 बळी गेले आहेत. 

राज्यानुसार मृतांची संख्या

  • महाराष्ट्र - 2 हजार 286
  • गुजरात – 1 हजार 38
  • दिल्ली - 473
  • मध्यप्रदेश – 350
  • पश्चिम बंगाल – 317
  • उत्तरप्रदेश – 213
  • राजस्थान – 194
  • तामिळनाडू - 173

एकूण बळींमधील 5 हजार 44 म्हणजे  93.51 टक्के बळी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू या 8 राज्यात आहेत. त्यातही महाराष्ट्राचा वाटा 42.38 टक्के आहे. तर देशातील 23.71 टक्के बळी एकट्या मुंबईत गेले आहेत.



हेही वाचा -

रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून देण्याची प्रवासी संघटनेची मागणी

मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा