Advertisement

बोरीवलीत पहिलं स्मार्ट कॅन्सर डे केअर सेंटर


बोरीवलीत पहिलं स्मार्ट कॅन्सर डे केअर सेंटर
SHARES

बोरीवली - जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने बोरीवली पूर्व इथल्या सुकुरवाडी बस स्थानकाजवळ शनिवारी एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट तर्फे केमिओथेरपी आणि कर्करोग उपचारांचं केंद्र सुरू करण्यात आलं. हे मुंबईतील पहिलंच अद्ययावत कर्करोग उपचार केंद्र असून या माध्यमातून रुग्णांना त्यांच्या घराजवळच उपचार घेता येणार आहेत. रुग्णांना केमिओथेरपी देण्याबरोबरच उपचारांचं मूल्यांकन करणं, चाचण्या आणि निदान करणं हे या डे केअर सेंटर आणि जागरुकता कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे.

कोणत्याही प्रकारचा कर्करोग झाल्यास अंदाजे 50% रुग्णांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी केमिओथेरपीची आवश्यकता भासते. सामान्य रुग्णांसाठी केमिओथेरपीची किमान 6 सत्रे करण्यात येतात. प्रत्येक केमिओथेरपीसाठी रुग्णांना हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास करावा लागतो.

"घराजवळ कर्करोगावरील उपचार प्राप्त व्हावेत, यासाठीचे हे बोरिवलीतील पहिले स्मार्ट सेंटर आहे. पहिल्या टप्प्यात अशी अजून काही केंद्रे सुरू करण्याची योजना आहे. या केंद्रांमध्ये ब्लड ट्रान्स्फ्युजन, हायड्रेशन थेरपी, निदान आणि सर्व उपचार प्रक्रिया पुरविण्यात येतील", असं एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील ऑन्कोसर्जन आणि उपाध्यक्ष डॉ. रमाकांत देशपांडे म्हणाले.

तर, हे केंद्र सुरू करण्याबरोबरच टेलिमेडिसीन सुविधा सुरू करणार असल्याचं डॉ. दीपक पारिख म्हणाले. या वेळी ऑन्कोसर्जन आणि एसीआयचे संचालक डॉ. संजय शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल दत्ता उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा