Advertisement

“सावधानता हाच अॅसिड अटॅकला प्रतिबंध”!

ज्या व्यक्तीवर अॅसिड अटॅक होतो, त्या व्यक्तीच्या शरिरापेक्षा त्याच्या मानसिकतेवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होताे, त्या व्यक्तीचा आत्मविश्वास संपूर्ण ढासळतो, असंही मत पूजा वेलिंग-नाईक यांनी यावेळी व्यक्त केलं. या संवादात सहभागी होत विद्यार्थिनींनी त्यांच्या मनातल्या शंकांना मोकळी वाट करून दिली.

“सावधानता हाच अॅसिड अटॅकला प्रतिबंध”!
SHARES

एखाद्या तरुणीवर अॅसिड हल्ला होण्यामागे केवळ प्रेमप्रकरण हेच एकमेव कारण नसतं. तर नोकरी-धंद्यातील यशस्वी महिलांवरही अॅसिड हल्ला झाल्याची अनेक उदहरणे आहेत. भारतात दरवर्षी ३०० पेक्षा जास्त तरुणींवर अॅसिड अटॅक होतात. दुर्दैवाने, अॅसिड हल्ला पूर्णपणे रोखणं आपल्या हातात नसलं तरी आपण त्याबाबत सावधगिरी नक्कीच बागळू शकतो, असं मत अभिनेत्री पूजा वेलिंग-नाईक हिने व्यक्त केलं.

बोरीवलीच्या शेठ गोपाळजी हेमराज हायस्कूल आणि ज्युनिअर काॅलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अॅसिड अटॅकविषयक जागरूकता या विषयावर कार्यक्रमचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पूजा वेलिंग-नाईक हिने विद्यर्थिनीशी संवाद साधला.



विशेष कायदा आला

पूर्वी आपल्या देशात अॅसिड अटॅक रोखण्यासाठीची विशेष तरतूद असलेला कायदा अस्तित्वात नव्हता, पण २०१३ पासून असा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येते. तसंच २०१६ मध्ये विकलांग व्यक्तींच्या अधिकार कायद्यात सुधारणा करून 'अॅसिड अॅटॅक सर्व्हायव्हर्स'ना शारीरिक अपंग म्हणून गणलं जाऊ लागलं, अशी माहिती तिने दिली.

ज्या व्यक्तीवर अॅसिड अटॅक होतो, त्या व्यक्तीच्या शरिरापेक्षा त्याच्या मानसिकतेवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होताे, त्या व्यक्तीचा आत्मविश्वास संपूर्ण ढासळतो, असंही मत पूजा वेलिंग-नाईक यांनी यावेळी व्यक्त केलं. या संवादात सहभागी होत विद्यार्थिनींनी त्यांच्या मनातल्या शंकांना मोकळी वाट करून दिली.



काय काळजी घ्यावी?

कोणत्याही कौटुंबिक वादाच्या किंवा प्रेमप्रकरणातील तसंच व्यावसायिक वादानंतर तरुणी-महिलांनी शक्यतो एकट्याने फिरू नये, कारण हल्लेखोर हा एकट्या व्यक्तीवर हल्ला करण्याची अधिक शक्यता असते, असं पूजाने सांगितलं. देशात अॅसिड किंवा घातक रसायनं खुल्याने विकण्यास प्रतिबंध करणारे अनेक कायदे असले, तरी आजही अनेक ठिकाणी अॅसिड खुलेआम विकलं जात असल्याची खंतही पूजाने व्यक्त केली.


अॅसिड अटॅक हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे. या विषयावर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनमोकळी चर्चा करावी, त्यांच्या मनातील भावना-शंका व्यक्त कराव्यात, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. तसंच असिड अटॅकबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिनेही हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
- उज्ज्वला झारे, मुख्याध्यापिका, जी. एच. हायस्कूल आणि ज्युनिअर काॅलेज



हेही वाचा-

धक्कादायक! मुंबईतील ४० टक्के तरूणाई तणावग्रस्त

'त्या' पाच वर्षांच्या चिमुकलीवर आठवड्याभरात लिंग दुरुस्ती शस्त्रक्रिया



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा