Advertisement

धक्कादायक! मुंबईतील ४० टक्के तरूणाई तणावग्रस्त

मुंबईतील प्रसिद्ध 'पोदार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन' या संंस्थेनं हे सर्वेक्षण केल असून यातूनच ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईला मायानगरी व स्वप्ननगरी म्हणून ओळखण्यात येतं, परंतु याच स्वप्ननगरीतील अनेक तरूण तणावग्रस्त हे वास्तव नक्कीच चिंताजनक आहे.

धक्कादायक! मुंबईतील ४० टक्के तरूणाई तणावग्रस्त
SHARES

राज्याची आर्थिक राजधानी आणि वेगवान शहर अशी ओळख असलेल्या मुंबई शहरातील ४० टक्के तरूणाई सध्या तणावग्रस्त असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. विशेष म्हणजे ही सर्व तरूण मंडळी अवघ्या १४ ते २५ वयोगटातील असून यातील फक्त १० टक्के मुलांच्या पालकांना त्यांच्या मानसिक स्थितीची कल्पना आहे.


वास्तव चिंताजनक

मुंबईतील प्रसिद्ध 'पोदार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन' या संंस्थेनं हे सर्वेक्षण केल असून यातूनच ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईला मायानगरी व स्वप्ननगरी म्हणून ओळखण्यात येतं, परंतु याच स्वप्ननगरीतील अनेक तरूण तणावग्रस्त हे वास्तव नक्कीच चिंताजनक आहे. विशेष म्हणजे तणावग्रस्त असणाऱ्या बहुतांश तरुणांना ताण-तणाव कसा दूर करावा, त्याबाबत कोणतं पाऊल उचलावं याबाबत फारशी माहितीही नसल्याचं समोर आलं आहे.


लूक बदलण्याची इच्छा

'पोदार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन' ने जवळपास मुंबईतील ७५० तरूण, बंगळूरू ५०० तरूण, चैन्नई ६५० तरूण यांच्याशी संपर्क साधला होता. त्यातील ७९ टक्के तरूणी आणि ६८ टक्के तरूण आपल्या दिसण्याबद्दल समाधानी नसून त्यातील ६८ टक्के तरूणींना आणि ४८ टक्के तरूणांचा कॉस्मेटिक सर्जरी करून स्वत:चा लूक बदलण्याची इच्छा आहे.


तरूणींची संख्या ४९ टक्के

त्याशिवाय मुंबईतील ३८ टक्के तरूणांना ते कायम तणावाचा सामना करतात असं वाटतं. तसंच २२ टक्के तरूणांना खूप कमी वेळा तणावाचा सामना करावा लागल्याचं त्यांनी या सर्वेक्षणात सांगितलं आहे. इतकचं नव्हे, तर कायम तणावाखाली असणाऱ्या तरूणींची संख्या ४९ टक्के असून त्याशिवाय फक्त २२ टक्के तरूणींना फार कमी वेळा तणावाचा सामना करावा लागत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.


सोशल मीडिया हेही कारण

त्याशिवाय सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणं हे सुद्धा एक तणावाचं कारण आहे. ७९ टक्के मुली आणि ६८ टक्के तरुण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यातील ५० टक्के तरुण-तरुणी ५ ते १० तास वेळ दररोज सोशल मीडियावर घालवतात, असंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.


सध्याची तरूणाई मित्र-मैत्रिणी, रिलेशनशिप, अभ्यास यांसारख्या गोष्टींवरून सतत त्रस्त असते. मौजमजा करण्याच्या वयात या सर्व गोष्टींचा त्रास करून घेतल्यानं ही तरूण मंडळी तणावाखाली जातात. त्यातूनच आत्महत्या, ड्रग्ज, यांसारख्या धक्कादायक गोष्टीला बळी पडतात. विशेष म्हणजे तणावग्रस्त तरूणांच्या अनेक पालकांना त्यांच्या मुलांच्या मानसिक स्थितीची कल्पनाही नसल्याची चिंताजनक बाब यानिमित्तानं उघड झाली आहे. तसंच काही वेळा मुलांप्रमाणे त्यांच्या पालकांचं सुद्धा मुलांच्या मानसिक स्थितीकडं लक्ष नसणं ही बाबही तेवढीच चिंताजनक आहे.

- स्वाती पोपट व्यास, संचालक, पोदार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनहेही वाचा-

'या' ११ टिप्स तुम्हाला नैराश्यापासून परावृत्त करतील...

मुंबईकर चाकरमानी सर्वाधिक तणावग्रस्त, आॅफिसच्या राजकारणाचा बळी

सोशल मीडिया सोसवेना! ५ कोटी भारतीयांना मानसिक आजारRead this story in हिंदी
संबंधित विषय