अवयवदान करत तिघांना दिलं जीवनदान

दहिसर - मरावे परी कीर्तीरूपी उरावे, असं आपण कायम म्हणतो... पण वैज्ञानिक प्रगतीमुळे आता ही म्हण बदलून मरावे परी अवयवरुपी उरावे, अशीही सांगता येईल. अवयदानाचं महत्त्व आता प्रत्येकाला कळू लागलंय आणि अवयव दान करण्याचा निर्णय बरेच जण घेऊ लागलेत... दहिसर पूर्व येथील अवधूतनगरात संपत कुटुंब यापैकीच एक. 53 वर्षांचे दिलीप संपत एका अपघातामुळे ब्रेन डेड अवस्थेत गेलेत... पण त्यांनी किडन्या आणि यकृतदान करून तिघांचे प्राण वाचवलेत.

एकंदरीतच काय, संपत कुटुंबाचा हा निर्णय कौतुकास्पद म्हणावा लागेल. या कुटुंबाप्रमाणेच विचार करणाऱ्यांची संख्या आणखी वाढायला हवी. तसं झालं, तर अनेकांना जगण्याचा खरा आनंद घेता येईल, हे मात्र नक्की.

Loading Comments