Advertisement

DRDO चे अँटी-कोविड औषध ‘2-DG’ लाँच, 'असा' होणार फायदा

डीआरडीओचे कोरोनावरील औषध २-DG सोमवारी आपातकालीन वापरासाठी रिलीज करण्यात आले.

DRDO चे अँटी-कोविड औषध ‘2-DG’ लाँच, 'असा' होणार फायदा
SHARES

डीआरडीओचे कोरोनावरील औषध २-DG सोमवारी आपातकालीन वापरासाठी रिलीज करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. आता हे औषध रुग्णांना दिलं जाऊ शकतं. हे औषध पावडरच्या स्वरूपात आहे. हे औषध सर्वात पहिले दिल्लीतील DRDO कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना दिले जाईल.

हे औषध DRDO च्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड साइंसेस (INMAS) ने डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजसोबत मिळून तयार केलं आहे. क्लीनिकल रिसर्चदरम्यान 2-डीजी औषधाच्या ५.८५ ग्रामचे पाउच तयार करण्यात आले आहेत.

याचे एक-एक पाउच सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात मिसळून दिले जातात. याचे चांगली परिणाम दिसून आले आहेत. ज्या रुग्णांना हे औषध दिले, त्यांच्यात वेगानं रिकव्हरी होत आहे. या आधारावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या औषधाला परवानगी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या औषधाच्या एका सॅशेची किंमत 500-600 रुपये असू शकते. सरकार यात काही अनुदानाची घोषणा देखील करू शकते, असा विश्वास आहे.

डीआरडीओनं या औषधासंदर्भात २ दावे केले आहेत आणि हे दोन्हीही खूप महत्त्वाचे आहेत. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, या औषधामुळे रुग्णांचे ऑक्सिजनवर अवलंबून राहणं कमी होईल. 

तसंच बरे होण्यासाठी त्यांना २-३ दिवस कमी लागतील, म्हणजे कोविड 19 च्या रुग्णांचा हॉस्पिटलायझेशनचा कालावधी कमी होणार आहे. संपूर्ण देशामध्ये सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्सची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत,हे औषध गेम चेंजर सिद्ध होऊ शकते.

प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सुधीर चंदना यांच्या म्हणण्यानुसार, सौम्य, मध्यम आणि तीव्र असे तिन्ही लक्षण असलेल्या रूग्णांवर 2-डीजीची चाचणी घेण्यात आली. सर्व प्रकारच्या रूग्णांना याचा फायदा झाला व त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत.

म्हणूनच, हे एक सुरक्षित औषध आहे. दुस-या टप्प्यातील चाचणीत रुग्ण बरे होण्याचा दर चांगला होता आणि तिस-या टप्प्यातील चाचणीत रुग्णांचे ऑक्सिजनवर अवलंबून राहणे यात लक्षणीय प्रमाणात घट बघायला मिळाली.

डीआरडीओ डॉ. रेड्डीज लॅबच्या सहाय्यानं वेगानं उत्पादन करण्याच्या प्रयत्नात आहे. आज दहा हजार डोसची पहिली तुकडी बाजारात आणली गेली आहे. सध्या हे औषध डीआरडीओच्या दिल्लीतील कोविड सेंटरच्या रुग्णांना देण्यात येणार आहे.हेही वाचा

‘म्युकरमायकोसीस’च्या रुग्णांसाठी ५ हजार इंजेक्शन उपलब्ध

स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा