Advertisement

रक्तदानासाठी पुढे या, डाॅ. राजेंद्र शिंगणे यांचं आवाहन

राज्यातील रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

रक्तदानासाठी पुढे या, डाॅ. राजेंद्र शिंगणे यांचं आवाहन
SHARES

राज्यातील रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतील सर्व घटक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसिलदार, सिव्हील सर्जन यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेवून नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, वाढदिवस तसेच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलेसेमिया, कॅन्सर रुग्णांसाठी रक्ताची नियमित गरज भासते. यासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे. असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धतेसाठी कार्यआराखडा तयार करावेत, असे निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले. रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन श्री.शिंगणे यांनी रक्तपेढ्यांना केले आहे.

मागील कोविड संसर्गाच्या लाटेत रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. रुग्णायले, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावाधाव या काळात झाली. अवघे दोन ते तीन दिवस पुरेल इतकंच रक्त काही ठिकाणी शिल्लक होतं. अशा आणीबाणीच्या प्रसंगी रक्तदान करण्यासाठी सरकारला आवाहन करावं लागलं होतं. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून कोविड नियमांचं पालन करत रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा-

गुरुवारपासून गर्भवती महिलांचं लसीकरण, 'या' ३५ रुग्णालयांमध्ये होणार लसीकरण

परदेशात जाणारे विद्यार्थी, खेळाडू, कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत ७ ठिकाणी लसीकरण केंद्र


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा