Advertisement

'आॅटिझम' जनजागृतीसाठी डाॅक्टरांची 'लोकल'वारी !


'आॅटिझम' जनजागृतीसाठी डाॅक्टरांची 'लोकल'वारी !
SHARES

नवी मुंबई आणि ठाण्यातील लोकल प्रवाशांना शनिवारी एक वेगळाच अनुभव आला. प्रत्येक रेल्वे स्थानक आणि लोकलच्या डब्यांमध्ये डाॅक्टर पालक-स्वयंसेवक गटागटाने आॅटिझम (स्वमग्नता) या मनोवस्थेविषयीची माहिती देत होते. यावेळी आॅटिझमची लक्षणे, निदान आणि उपचार याविषयीची सविस्तर माहिती प्रवाशांना मिळत होती. निमित्त होतं नवी मुंबईतील चाइल्ड रिअॅक्ट फाऊंडेशनने राबवलेल्या आॅटिझम जनजागृती मोहिमेचं!



आॅटिझम (स्वमग्नता) या मनोवस्थेविषयी समाजात, विशेषत: पालकांमध्ये जनजागृती व्हावी आणि आॅटिझमग्रस्त बालकांना वेळेवरच योग्य ते उपचार आणि समुपदेशन मिळावे, या हेतूने आॅटिझमग्रस्त बालकांचं समुपदेशन आणि उपचार करणाऱ्या चाइल्ड रिअॅक्ट फाऊंडेशन  या संस्थेने एक विशेष जनजागृती अभियान हाती घेतलं आहे. २ एप्रिलला जागतिक आॅटिझम जनजागरूकता दिन आणि त्यानंतरचा संपूर्ण आठवडा आॅटिझम जनजागृती सप्ताह म्हणून पाळला जातो.


डाॅ. सुमीत शिंदे यांचा पुढाकार 

शनिवारी ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासूनच नवी मुंबई आणि ठाण्यातील एकूण १६ रेल्वे स्थानकांमध्ये आॅटिझम जनजागरूकता मोहीम राबवण्यात आली. चाइल्ड रिअॅक्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि थेरेपिस्ट डाॅ. सुमीत शिंदे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये नेरुळ येथील चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचे ३० डाॅक्टर आणि सुमारे ५० पालक-स्वयंसेवक सहभागी झाले होते.

'आॅटिझम ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. तो काही रोग नाही. अशा व्यक्ती स्वत:च्या जगात असतात. त्यांना इतरांसारखं नाॅर्मल लाइफ जगता येत नाही. पण एखादी व्यक्ती आॅटिस्टिक आहे, हे जर वेळीच म्हणजे लहानपणीच ओळखलं गेलं, तर त्यावर योग्य ते उपचार-समुपदेशन आणि प्रशिक्षण मिळून त्याला एक चांगलं आयुष्य जगता येईल, यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो', अशी प्रतिक्रिया चाइल्ड रिअॅक्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ. सुमीत शिंदे यांनी दिली.


आॅटिझम (स्वमग्नता) म्हणजे नेमके काय? लहान मुलांमध्ये त्याची वेगवेगळी लक्षणे कोणती असू शकतात? ही लक्षणे आढळल्यानंतर पालकांनी काय करायला हवं? अशा प्रकारची माहिती आम्ही लोकलमधल्या प्रवाशांना दिली.

सुमीत शिंदे, अध्यक्ष, रिअॅक्ट फाऊंडेशन



हेही वाचा

मुंबईत २.७२ करोड व्यक्तींना ऑटिझम


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा