सुगंधी सुपारीवरील बंदी पुढील सहा महिने कायम

  Mumbai
  सुगंधी सुपारीवरील बंदी पुढील सहा महिने कायम
  मुंबई  -  

  राज्य सरकार तंबाखु-गुटखाउत्पादकांच्या दबावाला बळी पडतोय की काय? असा प्रश्न उपस्थित झाला खरा, पण पुढचे सहा महिने तरी सुगंधी सुपारीवरील बंदी कायम राहणार आहे. अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)ने नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे पुढच्या सहा महिन्यांसाठी सुगंधी सुपारीच्या विक्रीवर बंदी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. तर यासंबंधीची स्वतंत्र माहितीपत्रक जारी करण्यात आलेले असल्याचेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एक सदस्यीय समितीचा काय निर्णय येईल, यावर बंदी कायम राहणार की उठणार, याबाबतचा निर्णय होणार आहे. 


  बंदी उठल्याच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. सुगंधी सुपारीच्या विक्रीवरील बंदी कायम असून पुढचे सहा महिने बंदी कायम असणार आहे. तर एक सदस्यीय समितीचा जो काही अहवाल असेल, त्यावर पुढचा निर्णय अवलंबून असेल.

  चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त (अन्न) मुख्यालय, एफडीए

  सुगंधी सुपारीमध्ये कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारास कारणीभूत ठरणारे असे घटक असतात. सुगंधी सुपारी गोड, चविष्ट असल्याने अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण सेवन करतात आणि मग त्याचे व्यसन लहान मुलांनीही जडते. जितक्या अधिक प्रमाणात सुगंधी सुपारीचे सेवन केले जाईल तितका तोंडाच्या आणि घशाच्या कर्करोगाचा धोका अधिक वाढतो. हीच बाब लक्षात घेत 2012 मध्ये गुटखा, पानमसाल्यापाठोपाठ 2013 साली सुगंधी सुपारीवर राज्यात बंदी घालण्यात आली. पण  ही बंदी उठवण्याच्या सुगंधी सुपारी  उत्पादकांच्या  मागणी दखल सरकारला घ्यावीच लागली.


  सहा महिने बंदी कायम असली तरी बंदी उठवण्याचा घाट घातलाय हे तितकेच खरे आहे. तर ही बंदी  उठली तर त्याचे परिणाम नक्कीच जनतेच्या आरोग्यावर होणार आहे. त्यामुळे बंदीसारखा चांगला निर्णय रद्द करणे हे योग्य ठरणार नसल्याने बंदी कायम ठेवण्याची आमची मागणी आहे. त्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी करणार आहे.

  - यजुर्वेदी राव, माहिती अधिकार कार्यकर्ते

  दरम्यान गेल्या चार-पाच दिवसांपासून सुगंधी सुपारीवरील बंदी उठवल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे एफडीएने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत बंदी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील सहा महिन्यांसाठी सुगंधी सुपारीच्या विक्रीवरील बंदी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.  'मुंबई लाइव्ह'ने मात्र बंदी कायम असून बंदी उठवण्यासाठी सुगंधी सुपारी उत्पादक जोर लावत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.