Advertisement

बाईक अॅम्ब्युलन्सने ४ महिन्यांत वाचवले ८२३ रुग्णांचे प्राण

गरजू रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावे म्हणून मुंबईतील गल्लीबोळात शिरुन रुग्णांना बाहेर काढणारी बाईक अॅम्ब्युलन्स सेवा ४ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. गेल्या ४ महिन्यांत जवळपास ८२३ रुग्णांना या बाईक अॅम्ब्युलन्सने आपत्कालीन सेवा दिली आहे.

बाईक अॅम्ब्युलन्सने ४ महिन्यांत वाचवले ८२३ रुग्णांचे प्राण
SHARES

गरजू रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावे म्हणून मुंबईतील गल्लीबोळात शिरुन रुग्णांना बाहेर काढणारी बाईक अॅम्ब्युलन्स सेवा ४ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या ४ महिन्यांत जवळपास ८२३ रुग्णांना या बाईक अॅम्ब्युलन्सने आपत्कालीन सेवा दिली आहे.


'गोल्डन अवर' महत्त्वाचा

मुंबईच्या चिंचोळ्या गल्ल्यातून त्वरीत मार्ग काढून 'गोल्डन अवर' मध्ये त्या रुग्णाला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने ही बाईक अॅम्ब्युलन्सची सेवा २ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. १०८ क्रमांकावर संपर्क केला असता ही अॅम्ब्युलन्स नि:शुल्कपणे रुग्ण असलेल्या ठिकाणी तत्काळ पोहोचते.


अॅम्ब्युलन्स कुठे सुरू?

सद्यस्थितीत मुंबईतील १० ठिकाणी ही सेवा सुरू आहे. भांडुप, मानखुर्द, धारावी, नागपाडा, मालाड, चारकोप, गोरेगाव, ठाकूर व्हिलेज, कलिना आणि खार दांडा या ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे.


काय साहित्य?

या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये उपचार करण्यासाठी लागणारं साहित्यही उपलब्ध करुन देण्यात आलं आहेत. ऑक्सिजन मास्क, एअर-वे कीट, सक्शन मशिनही यांत उपलब्ध आहेत. शिवाय स्ट्रोक, हृदय विकाराचा झटका, अस्थमा यांवरील औषधंही आहेत.


गोल्डन अवरमध्ये रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशावेळी ट्रॅफिकमध्ये बराच वेळ वाया जातो. असावेळी बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून रूग्णावर त्वरित उपचार करण शक्य होतं.

- डॉ. ज्ञानेश्वर शेळके, सीओओ, महाराष्ट्र एमर्जेन्सी मेडिकल सर्व्हिसेसहेही वाचा-

बाईक अॅम्ब्युलन्स’ची सेवा सुसाट, 2 महिन्यांत 450 रुग्णांचे वाचवले प्राणसंबंधित विषय
Advertisement