Advertisement

राजावाडी रुग्णालयात रक्त घटक विलगीकरण केंद्र


राजावाडी रुग्णालयात रक्त घटक विलगीकरण केंद्र
SHARES

महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात रक्त घटक विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. शुक्रवारी या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. महापालिका, रोटरी क्लब आणि हायपन ग्रुपच्या मदतीने उपनगरातील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात रक्त घटक विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. रक्त घटक विलगीकरण केंद्र असणारं राजावाडी हे पूर्व उपनगरातील पहिलंच रुग्णालय आहे.

राजावाडी या रुग्णालयाची 1956 साली डिस्पेन्सरी म्हणून स्थापना करण्यात आली. 596 बेडचे हे रुग्णालय आतापर्यंत रुग्णाला चांगले उपचार देत आहे. त्यानंतर येथे रक्तपेढी ही उपलब्ध करुन देण्यात आली. पण, रक्त विघटन केंद्र नव्हते. यासंबंधातील प्रस्ताव महापालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांना दिल्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव लगेच मान्य करुन शुक्रवारी या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.  

महापालिकेच्या किंवा राज्य सरकारच्या मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये रक्त घटक विलगीकरण केंद्र सुरू आहे. पण, पनगरातील राजावाडी हे पहिलंच रुग्णालय असेल, जिथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुंबई शहरात एकूण 49 पालिका, खासगी रुग्णालय आणि डिस्पेन्सरीज आहेत. ज्यातील फक्त महापालिकेच्या 8 रुग्णालयांमध्येच रक्त घटक विलगीकरण केंद्र आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागात निधीचा अजिबात अभाव नाही आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी रुग्णालयात असणाऱ्या कमतरतेवर लक्ष देऊन आम्हाला तसा प्रस्ताव पाठवावा. चांगल्या गोष्टीसाठी कोणाचीही वाट पाहण्याची गरज नाही. सरकारने रक्तदानासाठी मोठ-मोठे उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे रक्तदानाविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे.

आय. ए. कुंदन, महापालिका अतिरिक्त आयुक्त(उपनगरे)

तसंच रक्त वाया जाण्याच्या तक्रारीवरही कुंदन यांनी नाराजी व्यक्त केली. “रक्त खराब होतं किंवा त्याचा नीट वापर केला जात नाही त्यामुळे ते वाया जातं.  त्यामुळे त्याचा नीट वापर हा झालाच पाहिजे. त्यासाठी रक्त घटक विलगीकरण केंद्र महत्त्वाचं असणार आहे.”



राजावाडी रुग्णालयातील रक्तपेढीची वर्षाची 5 हजार लिटर बॉटल्स एवढी क्षमता आहे. या क्षमतेचा वापर करुन या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला रक्तासाठी अजिबात वणवण करण्याची गरज पडणार नाही, असंही कुंदन यांनी स्पष्ट केलं.

रक्त घटक विलगीकरण केंद्राद्वारे रक्तातील प्लाझ्मा आणि रक्तपेशी वेगळ्या केल्या जाऊ शकतात. एका व्यक्तीच्या रक्तामुळे जवळपास 4 ते 5 रुग्णांचे जीवन वाचू शकते. तसंच रक्तातील प्लाझ्मा हा एक वर्षभर साठवून ठेवता येतो. त्याचाही उपयोग आपात्कालीन परिस्थितीत असलेल्या रुग्णांसाठी केला जातो. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात रक्त घटक विलगीकरण केंद्र असणं हे गरजेचं आहे. त्यासोबतच रक्तदानाविषयी आपल्या राज्यात जागृती होणं गरजेचं आहे, असं मत उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केलं.

कार्यक्रमाला कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे तसंच महापालिकेचे उपायुक्त संतोष धामणे हे देखील उपस्थित होते.



हेही वाचा

जागतिक बीअर दिन - प्रकृतीसाठी बीअरचे फायदे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा