Advertisement

विभागीय स्तरावर होणार प्लाझ्मादात्यांची तपासणी

कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्मा उपचार देण्यासाठी वेळेत रक्तद्रव उपलब्ध होण्यासाठी केईएम रुग्णालयात रक्तद्रव पेढी सुरू करण्यात येणार आहे.

विभागीय स्तरावर होणार प्लाझ्मादात्यांची तपासणी
SHARES

कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्मा उपचार देण्यासाठी वेळेत रक्तद्रव उपलब्ध होण्यासाठी केईएम रुग्णालयात रक्तद्रव पेढी सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाबाधितांवरील प्लाझ्मा उपचारासाठी आवश्यक प्लाझ्मा मिळविण्यासाठी रुग्णालये आणि कुटुंबाचे नातेवाईक यांना धावपळ करावी लागते. त्यामुळं त्यांची ही धावपळ थांबविण्यासाठी व त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विभागीय स्तरावर त्यांची तपासणी केली जाणार आहे.

प्लाझ्मा केंद्रीय पद्धतीने एकाच ठिकाणाहून पुरविणे सोयीचे करण्यासाठी केईएम रुग्णालयात मुंबईतील पहिली प्लाझ्मा पेढी सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी आवश्यक सामग्री आणि मनुष्यबळ येत्या काही दिवसांत उपलब्ध केले जाणार. २ आठवड्यात ही रक्तपेढी कार्यरत होणार आहे.

रुग्णालयात सध्या ३५०हून अधिक प्लाझ्मा साठविलेला आहे. तेव्हा रक्तद्रव साठविणे, दुसऱ्या रुग्णालयांना देणे ही प्रक्रिया सुरूच आहे. परंतु याला केंद्रीयस्वरूप देण्यासाठी प्लाझ्मा पेढी निर्माण केली जाणार आहे. रुग्णालयानं ३० हून अधिक प्लाझ्माच्या पिशव्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांना दिल्याचं समजतं.

प्लाझ्माची साठवणूक एक वर्षांपर्यंत करता येते. त्यामुळे आवश्यकतेनुसार येथून प्लाझ्मा पुरविला जाणार आहे. कोरोनामुक्त दात्यांच्या प्लाझ्मा देण्यापूर्वी विविध तपासण्या करून ते पात्र आहेत का ठरविले जाते. त्यामुळे तपासणीसाठी आणि प्लाझ्मा देण्यासाठी दात्यांना रुग्णालयात येणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळं दात्यांची अडचण दूर करण्यासाठी विभागीय कोरोना नियंत्रण कक्ष किंवा जवळील आरोग्य केंद्रात त्यांची तपासण्या करण्यात येणार आहे.  



हेही वाचा -

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात

अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा