Advertisement

५० टक्क्यांहून अधिक रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे तीनतेरा

मुंबईतील ५० टक्क्यांहून अधिक रुग्णालयं आणि नर्सिंग होम अग्निसुरक्षाच्या आवश्यक निकषांची पूर्तता करीत नाहीत.

५० टक्क्यांहून अधिक रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे तीनतेरा
(Representational Image)
SHARES

अहवालानुसार, मुंबईतील ५० टक्क्यांहून अधिक रुग्णालयं आणि नर्सिंग होम अग्निसुरक्षाच्या आवश्यक निकषांची पूर्तता करीत नाहीत. त्यामुळे भविष्यात रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात येऊ शकतात.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अग्निशामक तपासणी केली असता असं आढळलं की, तपासणी करण्यात आलेल्या १ हजार ३२४ सुविधांपैकी ७०१ रुग्णालये, नर्सिंग होम आणि प्रसूती घरं महाराष्ट्र अग्निरोधक आणि जीवन सुरक्षा उपाय कायदा २००६ चे पालन करीत नाहीत. त्यापैकी ३८ रुग्णालयं राज्य सरकार आणि पालिकेची आहेत.

मंगळवारी, २ मार्च रोजी, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात हा खुलासा केला. तसंच रुग्णालयातील व्यवस्थापनांना यासंदर्भात नोटीस देखील बजावण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अतुल भटकळकर, अबू आझमी, यामिनी जाधव, देवेंद्र फडणवीस आणि इतर कित्येक नेत्यांनी एकत्रितपणे नगरविकास मंत्री यांना हा प्रश्न विचारला. भंडारा घटनेनंतर झालेल्या अग्निशामक तपासणीचा तपशील मागवला.

जानेवारी महिन्यात भंडाऱ्यात सरकारी रुग्णालयात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा ऑडिट करण्यात आले. भंडारा घटनेत १० बालकांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते आणि आगीच्या वेळी बाळांना का वाचवू शकले नाही? याचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. राज्यभरातील सर्व सरकारी रुग्णालयांची अग्निशामक आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

अगदी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनीही राज्य सरकारला मुंबईत तपासणी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर अनेक रुग्णालयांनी अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचं पालिकेनं पूर्वीच्या अनुपालन मोहिमेवरून स्पष्ट केलं.

मंत्री म्हणाले की, ठाण्यातील ३४७ रुग्णालयांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यापैकी २८  बंद असल्याचं आढळून आलं. तर १५१ जणांनी अग्निशामक अनुपालन सादर केलं होतं. तर उर्वरित १६८ जणांना २२ फेब्रुवारीपर्यंत ती सादर करण्यास मुदत देण्यात आली होती. याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल महानगरपालिकांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली यावर चुप्पी साधली गेली.हेही वाचा

पश्चिम उपनगरातील ५ विभागात 'इतकी' रुग्णवाढ

वन्यप्राण्यांसाठी राणीच्या बागेत रुग्णालय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा