Advertisement

मुंबई बाहेरून उपारासाठी येणाऱ्यांकडून पालिका रुग्णालयांत अतिरिक्त शुल्क घेण्याचा विचार

यास तीव्र विरोध होत आहे.

मुंबई बाहेरून उपारासाठी येणाऱ्यांकडून पालिका रुग्णालयांत अतिरिक्त शुल्क घेण्याचा विचार
SHARES

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुंबईबाहेरील रुग्णांनी सेवा घेतल्यास त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचे संकेत मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातून (BMC Budget) देण्यात आले आहेत. यास तीव्र विरोध होत आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लगेचच आपली नाराजी नोंदवली आहे.

मुंबई शहरात व उपनगरात मुंबई महापालिकेची अनेक रुग्णालयं आहेत. या रुग्णालयांमध्ये आरोग्याच्या उत्तम सुविधा पुरवल्या जातात. अनेक मोठ्या व किचकट शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळं केवळ मुंबई शहरच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील व राज्यभरातील अनेक रुग्ण इथं उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यामुळं या रुग्णालयांमध्ये कायम मोठी गर्दी असते.

ही सर्व रुग्णालये मुंबईकरांच्या करातून चालत असतात. त्यामुळं बाहेरच्या रुग्णांसाठी इथं स्वतंत्र शुल्क लागू करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं महापालिका चाचपणी करेल, असं सुतोवाच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आलं आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यास तीव्र विरोध दर्शवला आहे. ही बाब आक्षेपार्ह व अन्यायकारक आहे. भाजपचा याला विरोध राहील, असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेनं कोस्टल रोड, जीएमएलआर, एसटीपी असे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प विनाअडथळा सुरू राहावेत. यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. हा निधी कसा उभा करता येईल यासाठी सल्लागार नेमण्याचं सुतोवाच महापालिकेनं अर्थसंकल्पात केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या हजारो कोट्यवधींच्या ठेवीतून आम्ही मुंबईकरांसाठी नवनवे प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन केलं होतं. त्यासाठी कोणतेही छुपे कर आणि कोणतेही टोल आम्ही लादले नाहीत. दुर्दैवानं, भाजप पुरस्कृत खोके सरकारनं मुंबई लुटली. त्यांचे खास बिल्डर आणि कंत्राटदारांना मदत केली आणि आता सर्वसामान्य नागरिकांवर कर आणि टोल लावण्याचा यांचा विचार आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर केली आहे.



हेही वाचा

राज्यातील निवासी डॉक्टरांचा 7 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा

आता तुम्हाला ॲपद्वारे मानसिक आरोग्याविषयी मिळेल योग्य माहिती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा