Advertisement

मुंबई महापालिकेच्या आता ४५० रुग्णवाहिका उपलब्ध

रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी तासनतास वाट पहायला लागण्याचं समोर आलं आहे. याचा फायदा उठवत खासगी रुग्णवाहिकांच्या चालकांकडून रुग्णांची लूट सुरू आहे.

मुंबई महापालिकेच्या आता ४५० रुग्णवाहिका उपलब्ध
SHARES

मुंबईत रोेज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र, रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकाच मिळत नसल्याचं समोर आलं आहे. तर काही रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी तासनतास वाट पहायला लागण्याचं समोर आलं आहे. याचा फायदा उठवत खासगी रुग्णवाहिकांच्या चालकांकडून रुग्णांची लूट सुरू आहे. याची दखल घेऊन आता मुंबई महापालिका रुग्णवाहिकांची संख्या वाढवणार आहे. महापालिकेने रुग्णवाहिकांची संख्या 100 वरून आणखी 350 ने वाढवून 450 करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय त्यांची सेवा आता 'अॅप'वर उपलब्ध होणार आहे.

मुंबईत सरकारी, पालिका आणि खासगी रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने  रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. 108 या सरकारी सेवेतील रुग्णवाहिका अनेक तास वाट बघूनही उपलब्ध होत नाही. त्याचा गैरफायदा खासगी रुग्णवाहिका चालक घेत आहेत. एक ते दोन किमीच्या अंतरासाठी 8 ते 10 हजार रुपये मोजावे लागत असल्याच्या तक्रारी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.

त्यामुळे पालिकेने रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या ताफ्यात आतापर्यंत 100 रुग्णवाहिका होत्या. त्यात आणखी 350 रुग्णवाहिकांची भर पडणार आहे. या रुग्णवाहिकांचा वापर कम्प्युटराइज्ड प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच, या रुग्णवाहिका अॅपद्वारे उपलब्ध होतील, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.



हेही वाचा -

विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा