Advertisement

घरोघरी जाऊन होणार रुग्णांची तपासणी, पालिकेकडून १० जणांची टीम तयार

मुंबई पालिकेनं लक्षणं असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन रुग्णांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरोघरी जाऊन होणार रुग्णांची तपासणी, पालिकेकडून १० जणांची टीम तयार
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पालिकेनं लक्षणं असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन रुग्णांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० जणांची एक वैद्यकीय टीम तयार करण्यात आली आहे. प्रत्येक टीमसाठी एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे.

गृहभेटीद्वारे करण्यात येणाऱ्या या वैद्यकीय तपासण्यांचे समन्वयन हे विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येणार आहे. गृहभेटींद्वारे करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासणींसाठी प्रत्येक विभागाच्या स्तरावर प्रत्येकी किमान १० तपासणी चमू आणि या प्रत्येक चमुसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था तात्काळ करवून घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. ही व्यवस्था रविवारपासून अंमलात आली आहे.

महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.  या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल, महापालिकेच्या विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि विविध खात्यांचे प्रमुख आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.हेही वाचा

मंबईतील उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, झोपडपट्टीत घटली

१८ ते ४४ वयोगटाला कोरोना लसीसाठी नोंदणी बंधनकारक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा