Advertisement

Exclusive: दादर स्थानकात प्रवाशांची होणार कोरोना चाचणी

महापालिकेच्या जी उत्तर विभागानं आपल्या विभागाच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exclusive: दादर स्थानकात प्रवाशांची होणार कोरोना चाचणी
SHARES

दिवाळीनंतर मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळं महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शिवाय, राज्य सरकारनं कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्यानं पालिका यंत्रणा सतर्क झाली असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच महापालिकेच्या जी उत्तर विभागानं आपल्या विभागाच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दादर स्थानकात कोरोनाची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळं बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे.

दादर स्थानकात प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याला रेल्वे प्रशासनानं परवानगी दिली असून, बुधवार २५ नोव्हेबरपासून या चाचणीला सुरूवात होणार आहे. दादर स्थानक हे मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्वाचं स्थानक आहे. या स्थानकात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची व बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळं गर्दीच्या ठिकाणी कोरोना सक्रीय होण्याची शक्यता असल्यानं दादर स्थानकात प्रवाशांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यत आल्याची माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागातील डॉ. विरेंद्र मोहिती यांनी दिली. 

दादर स्थानकात कोरोना चाचणी झाल्यावर एखाद्या प्रवाशाच्या आहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्यांला क्वारंटाइन करण्यात येणार आहे. जी उत्तर विभागातील वनिता समाज कोविड सेंटरमध्ये संबंधित प्रवाशाला क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचंही मोहिते यांनी सांगितलं.

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या तेजीनं वाढत आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या सीमांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांची स्क्रिनिंग करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेताल आहे. दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात या राज्यांतून ट्रेन किंवा विमानानं येणाऱ्या प्रवाशांकडं कोरोना चाचणीचे अहवाल असणं अनिवार्य आहे. शिवाय, प्रवाशांनी केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे.हेही वाचा -

'या' राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक

भारतात तयार होणारी कोविड लस ९० टक्के परिणामकारक, 'या' दिवशी देणार पहिली लस


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement