Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
41,102
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

महापालिकेनं ऑक्सिजनची तरतूद २३५ मेट्रिक टन इतकी वाढवली

महापालिकेनं ऑक्सिजनची तरतूद सध्याच्या २१० मेट्रिक टनवरून वाढवून २३५ मेट्रिक टन इतकी केली आहे.

महापालिकेनं ऑक्सिजनची तरतूद २३५ मेट्रिक टन इतकी वाढवली
SHARES

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, दुसरीकडे खासगी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळं ऑक्सिजन मिळवण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. परंतु, आता महापालिकेनं ऑक्सिजनची तरतूद सध्याच्या २१० मेट्रिक टनवरून वाढवून २३५ मेट्रिक टन इतकी केली आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपलब्धतेबाबत रुग्णालयांवर येणारा ताण सुसह्य होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रविवारी रात्री ऑक्सिजनअभावी वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेनं १६८ रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या जंबो कोविड केंद्रात नेले. मात्र खासगी रुग्णालयांपुढेही ऑक्सिजन पुरवठ्याची अडचण असून रुग्णांना कुठे न्यायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे.

मुलुंडच्या दुर्घटनेच्या वेळी महापालिकेनं जंबो केंद्रामध्ये व्यवस्था केली होती. आता ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा करून नंतर सिलेंडर परत घेण्यापेक्षा, शहरातील खासगी कोविड रुग्णालयांसाठी तरतूद वाढवण्यात आली आहे. पूर्वी ती २१० मेट्रिक टन इतकी होती. आता मागणी वाढली असून ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात येईल तेव्हा पुरेसा साठा रुग्णालयाकडे असेल, असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

रविवारी मुंबईतील अनेक खासगी रुग्णालये तसेच नर्सिंग होममध्ये ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. काही रुग्णालयांवर नॉन-कोविड रुग्णांना इतरत्र हलवण्याची वेळ आली. महापालिका रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या लिंडे आणि आयनॉक्स या दोन प्रमुख उत्पादकांकडून ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला होता. यातील एका उत्पादक कंपनीच्या ऑक्सिजन निर्मिती कंपनीचे केंद्र तांत्रिक अडचणींमुळे बंद झाले होते. त्यांनी त्यासंदर्भातील माहिती तत्परतेने दिली नाही. तसेच रुग्णांची ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळेही हा ताण वाढल्याचे पालिका प्रशासनानं सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा