Advertisement

चौथ्या टप्प्यात पालिका घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्याच्या विचारात

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) लसीकरण मोहिमेच्या चौथ्या टप्प्यात लोकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्याची योजना आखत आहे.

चौथ्या टप्प्यात पालिका घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्याच्या विचारात
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) लसीकरण मोहिमेच्या चौथ्या टप्प्यात लोकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्याची योजना आखत आहे. महाराष्ट्र COVID 19 टास्क फोर्सनं एका आठवड्यापूर्वी शिफारस केली होती की, लसीकरण केंद्रांवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन लस द्यावीत, अशी विनंती केली होती.

तथापि, ही योजना व्यवहार्य असू शकत नाही, असं सांगत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही शिफारस फेटाळून लावल्याची माहिती आहे.

महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, “या क्षणी आम्ही योजना राबवू शकत नाही. लसीकरणानंतर प्रत्येक लाभार्थी ३० मिनिटांपर्यंत निरीक्षणाखाली ठेवला जात आहे. चौथा टप्पा सुरू होईपर्यंत, आम्हाला दोन्ही लसींचे अधिक चांगले ज्ञान होईल. मग, आम्ही घरी जाऊन लसीकरण सुरू करण्याबद्दल विचार करू शकतो. "

मुंबईतील बहुतेक लसीकरण केंद्रांमध्ये जास्त प्रमाणात गर्दी होत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरी लस देण्यात यावी यासाठी विचार केला जात आहे.

“आंशिक अर्धांगवायू झालेल्या व्यक्तींना रुग्णवाहिकांमध्ये रोगप्रतिबंधक लस टोचण्यासाठी लसीकरण केंद्रात नेले जात असल्याचं आपण पाहत आहोत. देखरेखीखाली पालिकेनं घरी जाऊन लस देण्यास सुरू केली असती तर बरे झाले असते. लसीकरण केंद्रांवर गर्दी नियंत्रित करण्यास यामुळे मदत होईल,”असं राज्याच्या टास्क फोर्सच्या सदस्यानं सांगितलं.

दररोज १ लाख नागरिकांना लसीकरण करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं लसीकरण केंद्रे सुरू करीत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. “दररोज, आम्ही मोठ्या प्रमाणात लसीकरण प्रक्रियेत भाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या खासगी रुग्णालयांची तपासणी करीत आहोत. याशिवाय या यादीत आणखी रुग्णालयांचा समावेश केला जाईल, 'असं काकानी म्हणाले.



हेही वाचा

बीएमसीचं मिशन टेस्टिंग, दिवसाला ५० हजार चाचण्यांचं लक्ष्य

१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा