Advertisement

बीएमसीचं मिशन टेस्टिंग, दिवसाला ५० हजार चाचण्यांचं लक्ष्य

मुंबईत रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बीएमसीचं मिशन टेस्टिंग, दिवसाला ५० हजार चाचण्यांचं लक्ष्य
SHARES

मुंबईत रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालिका मुंबईत मिशन टेस्टिंग राबवणार आहे. यामध्ये मुंबईत दिवसाला ५० हजार कोरोना चाचण्या करण्याचं लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवलं आहे. सध्या मुंबईत २० ते २३ हजार चाचण्या रोज होत आहेत.

मिशन टेस्टिंगअंतर्गत  मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर अॅन्टिजन चाचण्या केल्या जाणार आहेत. मुंबईतील २५ प्रमुख मॉल मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची अॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटस्च्या स्टाफची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. 

याशिवाय वांद्रे, दादर बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर दर दिवसाला १ हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहेत. विशेषत: विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असणार आहे. मुंबईतील मुख्य बस स्थानक दादर, परळ येथे रोज १ हजार प्रवाशांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.   

खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरण वाढवण्यासाठीही पालिका कडक पावले उचलणार आहे. मुंबईतील ४३ खाजगी हॉस्पिटल लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.  खाजगी हॉस्पिटलमध्ये रोज १ हजार लसीकरण करण्याची सक्ती करण्यात येणार आहे. सध्या मुंबईत रोज ४५ हजार लोकांचे लसीकरण होते आहे. यांपैकी केवळ ५ हजार लोकांचे लसीकरण खाजगी हॉस्पिटलमध्ये होते. लसीकरणाची अपेक्षित संख्या गाठता आली नाही आणि सोबतच नियमाप्रमाणे योग्य सुविधा नसतील तर खाजगी हॉस्पिटलचे लसीकरण करण्याचे अधिकार प्रशासन काढून टाकणार आहे.



हेही वाचा -

धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र

१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा