Advertisement

सेरो सर्वेच्या परीक्षणासाठी खाजगी लॅबसोबत पालिका भागिदारी करू शकते

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सध्या अँटिबोडिजची चाचणी करण्यासाठी खासगी लॅबसोबत करार करण्याचा विचार करत आहे.

सेरो सर्वेच्या परीक्षणासाठी खाजगी लॅबसोबत पालिका भागिदारी करू शकते
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सध्या अँटिबोडिजची चाचणी करण्यासाठी खासगी लॅबसोबत करार करण्याचा विचार करत आहे. या चाचण्या सेरो सर्वेक्षण कार्यक्रमाचाच भाग म्हणून घेतल्या जात आहेत. ज्यामुळे यापूर्वी विषाणूची लागण झालेल्या लोकसंख्येची टक्केवारी समजण्यास मदत होईल.

मुंबईतील पालिकेच्या सेरो सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नुकताच खुलासा केला आहे की, झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवासी लोकसंख्येच्या मोठ्या भागात (५७ टक्के) अँन्टीबॉडी विकसित झाल्या आहेत. तर झोपडपट्टी नसलेल्या भागात COVID 19 शी लढणारे अँटीबॉडीज फक्त १६ टक्के आढळले. या प्रस्तावाअंतर्गत मंजूर खासगी प्रयोगशाळा नागरिकांकडून नमुने गोळा करतील आणि त्यांच्या केंद्रांवर त्यांची चाचणी घेतील.

खाजगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या या चाचण्यांचा खर्च पालिके तर्फे केला जाणार. सध्या हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जात असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

हेही वाचा : खासगी रुग्णालयात राखीव खाटा ठेवण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ

राज्यातील COVID 19  टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचं म्हणणं आहे की, "सेरो सर्वे द्वारे केलेल्या अँन्टीबॉडी चाचण्यांच्या परीक्षणामुळे मोठ्या लोकसंख्येमध्ये विषाणूचा धोका समजण्यास मदत होईल. यामुळे आम्ही संभाव्य प्लाझ्मा दान करणारे देखील ओळखू शकतो. खासगी प्रयोगशाळा एका महिन्यात या चाचण्या घेऊ शकतात. "

पालिकेनं आपल्या सेरो सर्वे परीक्षणाचा पहिला टप्पा आधीच पूर्ण केला आहे. तर दुसर्‍या टप्प्यात सुमारे दोन आठवड्यांपासून काम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, दरमहा एक सर्वेक्षण केल्यास त्यांना विषाणूचा प्रसार अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल.

प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, गोवंडी आणि धारावीसारख्या भागातील बहुतांश नागरिकांमध्ये COVID 19 शी लढा देणारे अँटिबॉडिज आढळले आहेत. अनुक्रमे ५७ टक्के आणि ४२ टक्के अशी आकडेवारी आहे. चेंबूर एक्सटेंशन आणि माझगावसारख्या भागातील रहिवाशांमध्ये तुलनेनं जास्त कोरोनाव्हायरस विषाणूविरूद्ध लढणारे अँटिबॉडिज सापडले.



हेही वाचा

मालाडच्या लाइफलाइन रुग्णालयाने आकारलं २१ लाखांचं बिल, गुन्हा नोंदवण्याची भाजपची मागणी

मुंबईत ८१ टक्के कोरोना रुग्ण बरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा