Advertisement

मुंबईत रोज ५० हजार लसीकरणाचं पालिकेचं नियोजन

दुसऱ्या टप्प्यात आणखी ७५ लसीकरण केंद्र पालिकेची रुग्णालये, उपनगरांतील पालिकेशी सलग्न १७ रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने येथे सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

मुंबईत रोज ५० हजार लसीकरणाचं पालिकेचं नियोजन
SHARES

कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने पूर्ण तयारी केली आहे. रोज १२ हजार मुंबईकरांना लस देण्याचं उद्दिष्ट पालिकेने ठेवलं आहे. सुरुवातीला ८ केंद्रांमार्फत कोरोनाची लस दिली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ७५ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. ही सर्व केंद्रे सुरू झाल्यानंतर दर दिवशी ५० हजार नागरिकांना कोरोनाची लस देणे शक्य होईल, असं पालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

मुंबईत पहिल्या टप्प्यात केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय, नायर रुग्णालय, विलेपार्लेमधील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय या आठ ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्याचं काम सुरू आहे. ही आठ केंद्रे सुरू झाल्यानंतर दर दिवशी १२ हजार नागरिकांना लस दिली जाणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यात आणखी ७५ लसीकरण केंद्र पालिकेची रुग्णालये, उपनगरांतील पालिकेशी सलग्न १७ रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने येथे सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या आठवडाअखेरीस ही केंद्रे लसीकरणासाठी सज्ज करण्यात येतील, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसंच वरळीमधील एनएससीआय, भायखळा येथील रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास, दहिसर येथील दोन, तर मुलुंड येथील एका अशा सहा ठिकाणी जम्बो करोना केंद्रातही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

लोकलमध्ये लवकरच उपलब्ध होणार वायफाय

मुंबई ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टवर बंदी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा