Advertisement

Coronavirus update: मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन नाहीच, रुग्ण वाढून देखील महापालिकेचा दावा

मुंबईत अद्याप कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

Coronavirus update: मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन नाहीच, रुग्ण वाढून देखील महापालिकेचा दावा
SHARES

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजारांच्या वर गेली आहे. मात्र, तरीही मुंबईत अद्याप कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही, असा दावा मुंबई महापालिकेने केले आहे. पालिकेने मुंबईत फिवर क्लिनिक सुरू केले असून या क्लिनिकमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या आधारावर पालिकेने हा दावा केला आहे.

कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने ९७ फिवर क्लिनिक सुरू केले आहेत. या फिवर क्लिनिकमध्ये आतापर्यंत ३५८५ लोकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९१२ लोकांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेय त्यात केवळ ५ लोकांना कोरोना झाल्याचं आढळून आलं. त्याच आधारे मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं नसल्याचं पालिकेने म्हटलं आहे. कोरोना विषाणू मुंबईत अद्याप दुसऱ्या टप्प्यातच आहे.तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्यावर कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू होतं, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी पालिकेने ०२० ४७०८५०८५ ही हेल्पलाइन सुरू केली होती. या हेल्पलाइनवर आतापर्यंत ६ हजार लोकांनी संपर्क साधला आहे. या ६ हजार लोकांना तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं आहे. यात सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांचा सर्वाधिक समावेश होता. यातील ३०० लोकांना करोनाची चाचणी करण्यास सांगण्यात आलं. तर १२०० लोकांना होम क्वॉरंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला. 



हेही वाचा -

लॉकडाऊनमुळं पश्चिम रेल्वेला ४२७ कोटीचे नुकसान

Coronavirus Update : हिरो मोटोकॉर्पकडून ६० मोबाईल अँब्युलन्स




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा