Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी पालिका लागली कामाला

मुंबईत पावसाळा सुरू होताच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) शहरातील सरकारी आणि खासगी इमारतींमध्ये डासांच्या पैदास होण्याच्या जागा नष्ट करण्यासाठी कामाला लागली आहे.

मलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी पालिका लागली कामाला
SHARES

मुंबईत पावसाळा सुरू होताच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) शहरातील सरकारी आणि खासगी इमारतींमध्ये डासांच्या पैदास होण्याच्या जागा नष्ट करण्यासाठी कामाला लागली आहे.

तपासणी केलेल्या ७२ हजार ८३५ पैकी ९६ मलेरियाचे कंटेनर तर डेंग्यू पसरवणारे ६०६ कंटेनर नष्ट करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासकिय संस्थेने अशा साइट नष्ट करण्यासाठी शहरातील ३ हजार ७५१ इमारतींमध्ये फवारणी केली आहे.

कीटकनाशक फवारणी करणारे अधिकारी डॉ. राजन नरिंगरेकर म्हणाले, “गेल्या वर्षी संपूर्ण शहर कडक लॉकडाऊनमध्ये होते. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करणाऱ्या टीमला बांधकाम स्थळ आणि इमारतींमध्ये प्रवेश करण्यात अडचण आली. आम्ही डासांच्या प्रजननासाठी परिसराची तपासणी करू शकलो नाही. याच कारणामुळे गेल्या वर्षी मलेरियाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. लॉकडाऊनमुळे बांधकाम ठिकाणी साचलेल्या पाण्यावर फवारणी होऊ शकली नाही.”

नारिंगरेकर म्हणाले की, डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी बांधकाम स्थळांना भेट देऊन योग्य ती फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२०२० साली मुंबईतील मलेरियाच्या घटनांमध्ये वाढ झाली. २०२० मध्ये जवळपास ११,००० मलेरियाचे रुग्ण आढळले. त्या तुलनेत २०१९ साली ८ हजार ८६८ रुग्ण आढळले होते. शहरांमध्ये खुल्या भागात अ‍ॅनोफिलस डासांच्या अनियंत्रित प्रजननामुळे रुग्णात मोठी वाढ पाहायला मिळाली.

तथापि, २०२० मध्ये डेंग्यूची प्रकरणे घसरून सुमारे ३००० च्या घरात आली होती. २०१९ साली डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी ही १४ हजार ९०७ इतकी होती. याचं कारण म्हणजे कोरोना काळात नागिरक घरातच होते.

तर उंदरांची लोकसंख्या कमी करण्यासाठी आणि लेप्टोस्पायरोसिसच्या प्रसाराला रोखण्यासाठी पालिका बिळांमध्ये विषबाधेची फवारणी करत आहे. प्रशासनानं जूनमध्ये सुमारे ३ हजार ०५५ उंदरांना विष प्राशन केलं.हेही वाचा

कोरोना रोखण्यासाठी 'मुंबई मॉडल' आता दिल्लीत राबवणार, दिल्लीतल्या मंडळाची मुंबईला भेट

'स्पुटनिक’साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत महापालिकेची चर्चा सुरू

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा