Advertisement

कोरोनावर मात करण्यासाठी बीएमसीचे १ हजार कोटी खर्च

कोरोना संकटावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेला मागील सात महिन्यांत तब्बल १ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करावा लागला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी बीएमसीचे १ हजार कोटी खर्च
SHARES

राज्यात सुरूवातीपासूनच कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव मुंबईत झाला होता. या कोरोना संकटावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेला मागील सात महिन्यांत तब्बल १ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करावा लागला आहे.

मुंबई महापालिकेची केईएम, सायन, नायर, कुपर ही चार प्रमुख रुग्णालये तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात १६ उपनगरीय रुग्णालये आहेत.  मे आणि जून महिन्यात ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण वाढले. त्यामुळे पालिकेने बीकेसी, एनएसई गोरेगाव, वरळी येथील एनएसई डोम या मोठ्या केंद्रासह ५२० हून अधिक ठिकाणी कोरोना काळजी केंद्र उभारली.

केईएम, सायन, कूपर, नायर या प्रमुख रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधांसाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सातरस्ता येथील कस्तुरबा रुग्णालय, शिवडी येथील जेरबाई वाडिया टीबी रुग्णालयासाठी दहा कोटी, भाभा रुग्णालय वांद्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय कांदिवली, राजावाडी रुग्णालय घाटकोपर या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांटचे अद्ययावतीकरण आणि ऑक्सिजन वितरण व इतर वैद्यकीय खर्चासाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयासाठी सर्वांत जास्त ५० कोटीहून अधिक 
खर्च करण्यात आला. करावा लागला आहे. कोरोना रुग्णांसाठी रेमेडेसिविर, टॉसिलिझुमॅब, फेवीपिरॅविर यासह विविध प्रकारची इंजेक्शन्स, औषधे खरेदी करण्यासाठी २०० कोटी रुपये खर्च झाला. रूग्णालयात अन्नपदार्थांसाठी १०० कोटीहून अधिक तर लाॅकडाउनच्या काळात श्रमिकांना खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यासाठी ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत.



हेही वाचा -

लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी 'ॲप'

मुंबईसह राज्यातील किमान तापमानात घट



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा