Advertisement

... म्हणून अधिक पीपीई किट्स घेणं पालिकेनं थांबवलं

यापुढे कोणत्याही पीपीई किट्सची खरेदी करणार नाही, असा निर्णय पालिकेनं घेतला आहे.

... म्हणून अधिक पीपीई किट्स घेणं पालिकेनं थांबवलं
SHARES

कोरोनाव्हायरसशी (Coronavirus Update) लढा देणाऱ्या आरोग्य सेवेतील कामगारांसाठी पुरेसे पीपीई (PPE) किंवा वैयक्तिक संरक्षक उपकरणे नसल्याबद्दल बरीच चर्चा झाली. आता त्यात पालिकेनं (BMC) अलीकडेच सांगितलं की, सुमारे २.५ लाख पीपीईचा साठा आहे. त्यामुळे पालिकेनं आता जाहीर केलं आहे की, ते यापुढे कोणत्याही पीपीई किटची खरेदी करणार नाहीत. सध्याचा साठा संपल्यास अधिकारी त्यासाठी निविदा मागवतील.

मुंबई मिररनं नुकत्याच दिलेल्या वृत्तात असं निदर्शनास आलं आहे की, पालिका प्रति पीपीईला २०७ रुपये अतिरिक्त पैसे देत होती. त्यात एन ९५ मास्क देखील होता. सर्व वस्तूंची एकत्रित किंमत पालिकेनं काढलेल्या किंमतीच्या अधिक नव्हती. हे लक्षात घेऊन, नवीन खरेदी स्थगित करण्याचा निर्णय योग्य असून आर्थिक दृष्टीकोनातून शहाणेपण आहे. शिवाय असं म्हटलं जातं की, पालिकेनं जास्त किंमत देऊन दररोज ५००० मास्क खरेदी केले.

पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी सर्व रुग्णालये आणि बीएमसी विभागांना ३० एप्रिलपासून खरेदी केलेल्या पीपीईची सविस्तर खरेदी यादी उपलब्ध करुन देण्यास सांगितलं आहे. प्रत्येक पीपीईला दिलेला दर तसंच पुरवठादाराची माहिती मागितली गेली आहे.

पालिकेनं दावा केलेल्या २.५ लाख पीपीईपैकी ७५ हजार राखीव ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरित सध्या वापरात आहेत.

भाजपचे आमदार अमित साटम यांनी यापूर्वी पीपीईंच्या वाढत्या किंमतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले, “आम्ही आक्षेप घेतल्यानंतर आणि संभाव्य घोटाळ्याकडे लक्ष वेधल्यानंतर पालिकेनं नुकतीच निविदा रद्द केली. राज्य विधानसभेच्या पुढील अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित करेन. प्रत्येक खरेदीमध्ये अनियमिता दिसून येत आहे. महानगरपालिकेनं जनतेचे लाखो रुपये जादा किंमतीच्या पीपीई किट्सवर वाया घालवले आहेत.”



हेही वाचा

मुलंडमधील 'या' शाळेचं रुग्णालयात रूपांतर, COVID 19 रुग्णांवर होतात उपचार

अरे बापरे..! कोरोनाने दिवसभरात घेतला 40 जणांचा बळी, तर 800 नवे रुग्ण


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा