Advertisement

मुलंडमधील 'या' शाळेचं रुग्णालयात रूपांतर, COVID 19 रुग्णांवर होतात उपचार

पालिकेनं मुलुंडमधील एका शाळेचे रुग्णालयात रूपांतर केलं आहे.

मुलंडमधील 'या' शाळेचं रुग्णालयात रूपांतर, COVID 19 रुग्णांवर होतात उपचार
SHARES

कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेला विलगीकरण केंद्र वाढवण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून रुग्णांना वेगळं ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास रोखता येऊ शकतं. पालिकेनं देखील यावर अधिक विचार करून विलगीकरण केंद्र आणखीन वाढवली आहेत. यासाठी पालिकेनं शाळांचा देखील वापर करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेनं मुलुंडमधील एका शाळेचे रुग्णालयात रूपांतर केलं आहे.

मुलुंड पूर्व इथल्या मिठाघर महानगरपालिका शाळेचे आता उपकरणं, औषधे, सुविधा, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर आणि डायलिसिस मशीन असलेल्या पूर्ण रूग्णालयात रुपांतर झाले आहे. या शाळेचे रुग्णालयात रूपांतर कोरोना रुग्णांसाठी  करण्यात आले आहे. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असताना, ऑपरेशन थिएटरचा अपवाद वगळता आता रुग्णालयात नवीन सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. सध्या वातानुकूलन, ऑक्सिजन सिलिंडर, चार डायलिसिस मशीन आणि दोन व्हेंटिलेटरसह आठ आयसीयू बेड आहेत.

रूग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून व्हेंटिलेटर आणि डायलिसिस मशीन उसने म्हणून घेण्यात आली आहेत. गेल्या महिन्याभरात ३०० हून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी ८० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले. या रुग्णालयाची क्षमता वाढवण्याची महापिलिकेनं सध्या आखली आहे. जेणेकरून  मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी इथल्या रूग्णांना पण उपचारासाठी आणता येईल.

COVID 19 रुग्णांच्या उपचाराचा खर्च पालिकेकडून केला जातो. तथापि, रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या डायलिसिसचे समर्थन करावे लागेल. कॅटरिंग सर्व्हिसद्वारे रूग्णांना न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवणसुद्धा दिले जाते. सुमारे ४५० चौरस फूट मीटरच्या एका वर्गात सहा किंवा सात रूग्णांकरिता सोय केली जाते. आतापर्यंत रुग्णालयात फक्त एक रुग्ण मरण पावला आहे. कोरोनाव्हायरसशी झुंज देणाऱ्या रूग्णांची अधिक काळजी घेण्यासाठी शाळेत ऑक्सिजन टँक्स बसवण्याची योजनाही पालिकेची आहे.



हेही वाचा

कोरोनावर उपचारासाठी पालिकेकडून 'ह्या' नवीन औषधाचा वापर

काेरोनाबाधित मृतदेहाचा व्हि़डीओ प्रसारित करू नका, पालिकेचं आवाहन


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा