Advertisement

कोरोना रुग्णांसाठी रोज 200 नवीन खाटांची पालिकेकडून व्यवस्था

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आगामी काही दिवसात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

कोरोना रुग्णांसाठी रोज 200 नवीन खाटांची पालिकेकडून व्यवस्था
SHARES
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आगामी काही दिवसात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या वाढत्या रुग्णसंख्येसाठी खाटांची संख्या मात्र अपुरी आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका खाटांची संख्या वाढवत आहे. रोज 200 खाटांची संख्या वाढवली जाणार असून आगामी 2 आठवड्यात नवीन 7 हजार खाटांची व्यवस्था केली जाईल, असं पालिकेने म्हटलं आहे.  


10 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेली मुंबईतील रुग्णालये आणि सेंटरमध्ये एकूण 4,274 खाटा आहेत. पुढील 11 दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 28 हजारांवर जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामधील 1400 म्हणजे 5 टक्के रुग्ण गंभीर असतील असा दावा अधिकृतपणे केला गेला आहे. गणितीय आकडेमोडनुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 70 हजार असेल, असं सांगण्यात येत आहे.  


महानगरपालिकेच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितलं की,  10 एप्रिलला एकूण खाटांची संख्या 1,960 होती. खाटांची संख्या वाढवत1 मे पर्यंत 2,900 आणि 10 मे पर्यंत 4,274 वर केली आहे. आम्ही दर आठवड्याला खाटांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवत आहोत.  केईएम, सायन, कस्तुरबा, कूपर, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल, बाळ ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि इतर अनेक खाजगी रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढवत असल्याचं म्हैसकर यांनी सांगितलं.


  महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की,  15 मेपर्यंत बीकेसीतील एमएमआरडीए ग्राऊंडवर लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी 1 हजार खाटांचं सेंटर सुरू होईल. यामधील 50 टक्के खाटांना आॅक्सिजनची सुविधा असेल. 



हेही वाचा -

जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले इथले 'हे' ७ परिसर सील

धारावी, माहीम आणि दादरमध्ये ६३ नवे करोनाग्रस्त





Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा