Advertisement

मुंबईतील कोरोनाव्हायरस रूग्णांसाठी नवीन ट्रिटमेंट सिस्टम

राज्य सरकार आणि महानगरपालिकेकडून कोरोना व्हायरसनं बाधित रुग्णांची विशेष व्यवस्था केली जात आहे.

मुंबईतील कोरोनाव्हायरस रूग्णांसाठी नवीन ट्रिटमेंट सिस्टम
SHARES

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकार आणि महानगरपालिकेकडून कोरोना व्हायरसनं बाधित रुग्णांची विशेष व्यवस्था केली जात आहे. महानगरपालिकेनं नुकत्याच सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, मुंबईतील COVID 19 रूग्णांना यापुढे चांगल्या उपचाराची सुविधा दिली जाईल. याशिवाय गरज पडल्यास त्यांना एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात हलवलं जाऊ शकतं.

कोराव्हायरसनं संक्रमित रुग्ण जर बरा होत असेल तर त्याला हेल्थ केअर सेंटरमध्ये हलवण्यात येऊ शकतं. जेणे करून त्याच्या जागी एखाद्या गंभीर असलेल्या रुग्णाला उपचार देता येऊ शकतो. माहितीमध्ये असं म्हटलं आहे की, महानगरपालिकेनं तीन-स्तरीय देखभाल प्रणाली जाहीर केली आहे. ज्यामध्ये समर्पित कोविड रुग्णालये, डीसीएचसी आणि कोविड केअर सेंटर (सीसीसी) पिरॅमिडच्या वरच्या, मध्यम आणि तळाशी आहेत.


ही प्रणाली कशी काम करते?

  • जे गंभीर आजारी आहेत त्यांना COVID रुग्णालयात दाखल केलं जाईल.
  • जे बरे होत आहेत पण त्यांच्यात लक्षण दिसून येत आहेत त्यांना सीएचसी (CHC)मध्ये हलवलं जाईल.
  • पुढील सुधारणानंतर आणि लक्षणे नसल्यानंतर, त्यांना CCC2 मध्ये हलवलं जाईल.


नवीन डिचार्ज पॉलिसी डॉ संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे.


  • CCC1 म्हणजे लॉज, हॉटेल्स इ. जिथे वैद्यकीय सेवा दिली जाते.
  • CCC2 म्हणजे सरकारनं तयार केलेल्या केंद्रात चोवीस तास डॉक्टर आणि नर्स यांच्या निरीक्षणाखाली उपचार केले जातात.

सध्या बेडची संख्याही पुरेशी नाही. यामुळे सध्या पालिकेचे अधिकारी कोरोनाव्हायरसनं संक्रमित रुग्णांच्या आरोग्य सुविधांच्या सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं  यासंदर्भात बोलताना सांगितलं की, नवीन प्रणाली कोविड १९ या आजारानं संक्रमित रुग्णांच्या वापरास अनुकूल बनवण्यात आलं आहे.





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा