कंत्राटदाराच्या रुग्णवाहिका पालिकेच्या प्रस्तावात

  Pali Hill
  कंत्राटदाराच्या रुग्णवाहिका पालिकेच्या प्रस्तावात
  मुंबई  -  

  मुंबई - रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणा-या पालिकेच्या रुग्णवाहिका आता जुनाट झाल्या आहेत, त्यामुळे अशा रुग्णवाहिका वापरता येणार नाहीत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. पालिकेच्या सहा रुग्णालयांसाठी तब्बल ३.४६ कोटी रुपये मोजून कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर आठ रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरम्यान, रुग्णसेवेतील या कंत्राटीकरणाला कामगार संघटनांनी कडाडून विरोध केला. मागील दोन वर्षांपासून कामगार संघटना याला विरोध करत आहेत.

  कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका घेऊन पालिका सेवेतील वाहनचालकांच्या हातचे काम हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये,असे सेना कामगार नेते सुनील चिटणीस म्हणालेत.

  शहरामध्ये चार साध्या, तीन विशेष रुग्णवाहिका कार्यरत आहेत. तसेच पूर्व उपनगरांत १८ साध्या, तर एक विशेष आणि पश्चिम उपनगरांत सहा साध्या आणि तीन विशेष रुग्णवाहिका कार्यरत आहेत. मुंबईतील लोकसंख्या लक्षात घेता पालिकेकडील रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने नव्या रुग्णवाहिका खरेदी करणे अपेक्षित आहे. मात्र तसे न करता पालिकेने कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी निविदा मागवल्या. त्यासाठी पालिकेला ३.४६ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.