Advertisement

मुंबई पालिकेची नवी 12 डायलिसीस केंद्र


मुंबई पालिकेची नवी 12 डायलिसीस केंद्र
SHARES

मुंबई - मुंबई महानगर पालिकेकडून नवीन 12 डायलिसीस केंद्र उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक-खासगी सहभागातून उभारण्यात येणाऱ्या या डायलिसीस केंद्रांसाठी जुलै महिन्यात निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासाठी 12 संस्थांची निवड लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता डायलिसीस केंद्राच्या उभारणीचे काम मार्गी लागणार आहे. 12 ठिकाणी 199 डायलिसीस यंत्र बसवण्यात येणार आहेत. एका यंत्राद्वारे दिवसाला दोन वेळा डायलिसीस करणं शक्य होणार आहे. त्यामुळे एका दिवशी 398 रूग्णांना डायलिसीसचे सेवा देणं शक्य होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे रूग्णांना माफक दरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

डायलिसीस केंद्रं

यंत्रांची संख्या

आयसी कॉलनी, बोरिवली (प)  11
मोहिली गाव, साकीनाका  24
मन्नत इमारत, दहिसर  40
सेंट जाँन अलाईड सहकारी गृहनिर्माण संस्था, वांद्रे (प)  24
वांद्रे गाव, बी. जे. रोड, वांद्रे (प)  17
हरियाली गाव, पवई  30
ओशिवरा गाव, वीरा देसाई रोड  10
एकसर गाव, बोरिवली (प)  11
क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले मनपा सर्वसाधारण रूग्णालय  10
माँ हॉस्पीटल  10
भाभा रूग्णालय, कुर्ला  5
व्ही एऩ देसाई रुग्णालय, खार  7

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा