Advertisement

15 जूनपर्यंत मुंबईत बेडची संख्या 1 लाखांवर

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेडची संख्या कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, बेडची कमतरता पडणार नाही असा विश्वास मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला आहे.

15 जूनपर्यंत मुंबईत बेडची संख्या 1 लाखांवर
SHARES
Advertisement

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेडची संख्या कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, बेडची कमतरता पडणार नाही असा विश्वास मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला आहे. 15 जूनपर्यंत बेडची क्षमता एक लाखांवर जाणार आहे. तर पुढील काही दिवसांत ही क्षमता एक लाख 15 हजारांवर नेण्याचे नियोजन असल्याचं चहल यांनी सांगितलं आहे.

मुंबईत सध्या 75 हजार बेड तैनात आहेत. शिवाय रुग्णवाढ होत असली तरी दररोज शेकडो रुग्ण बरे होऊन जात असल्यामुळे खाटा उपलब्ध होत आहेत. बीकेसी, गोरेगाव, वरळी डोम, महालक्ष्मी रेसकोर्स अशा ठिकाणी मोठय़ा संख्येने बेड उपलब्ध होत आहेत. याशिवाय मोठय़ा 33 खासगी रुग्णालयांतील 80 टक्के नियमित खाटा आणि 100 टक्के आयसीयू बेडही आता पालिकेच्या ताब्यात आले आहेत. त्यामुळे बेडची कमतरता पडणार नाही असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला.

कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आता काँटॅक्ट ट्रेसिंग आणखी प्रभावी करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना व्हायरस आपल्या मागे येणार नाही, तर आपण त्याला शोधून काढणार आहोत यासाठी व्हायरस चेसिंग’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये एका रुग्णामागे सध्या पाच ते सहा जणांना क्वारेंटाइन करण्याचे प्रमाण 15 म्हणजेच तिप्पट करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णाच्या काँटॅक्टमधील या 15 जणांना सक्तीने आणि प्रभावीपणे क्वारेंटाइन करण्यात येणार असल्याचे चहल यांनी दिली. अशा प्रकारे कोरोनाचा पाठलाग’ करून रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणले जाणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा -

मान्सूपूर्व काम अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता

२५ डॉक्टर्स वास्तव्यास असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये लागली आग
संबंधित विषय
Advertisement