Advertisement

'बोन-मॅरो ट्रान्सप्लांट'ची मोफत सुविधा हवीय, मग इथे या!


'बोन-मॅरो ट्रान्सप्लांट'ची मोफत सुविधा हवीय, मग इथे या!
SHARES

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये रक्त तयार होण्याचं प्रमाण कमी असल्याकारणाने त्यांना नियमितपणे रक्त देण्याची गरज भासते. पण, या रुग्णांमध्ये अनुरुप बोन-मॅरोचे यशस्वीपणे प्रत्यारोपण झाल्यास त्यांचं शरीर आवश्यक त्या प्रमाणात रक्त पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स तयार करू लागतं. परिणामी हा रुग्ण थॅलेसेमियामुक्त आयुष्य जगू शकतो.


गरजूंसाठी मोफत सुविधा

याच पार्श्वभूमीवर महापालिकेने मागील वर्षी बोरिवली पूर्व येथे सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू केलं. या हाॅस्पिटलमध्ये मार्च २൦१८ पासून बोन-मॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयात याच उपचारांचा खर्च अंदाजे २൦ ते २५ लाख एवढा आहे. गरजू रुग्णांना इतका खर्च करणं शक्य होत नाही. पण सुपरस्पेशालिटी उपचार केंद्रात गरजू रुग्णांसाठी ही सुविधा मोफत असणार आहे.

त्याचबरोबर या उपचार केंद्रात बालकांमधील रक्तदोष, कर्करोग यावर देखील उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती या उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी यांनी दिली आहे.

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये लाल पेशी दूषित असल्यामुळे त्यांच्या शरीरात योग्य त्या प्रमाणात रक्त तयार होत नाही. त्यामुळे त्यांना नियमितपणे अनुरुप रक्तदात्याचे रक्त घेऊन लाल पेशी द्याव्या लागतात. अशा रुग्णांच्या शरीरात योग्य बोन-मॅरो प्रत्यारोपण केलं की त्यांचं शरीर आवश्यक त्या प्रमाणात पेशींसह रक्त तयार करतं. त्यानंतर त्यांना रक्त देण्याची आवश्यकता भासत नाही.

- डॉ. ममता मंगलानी, संचालिका, सुपरस्पेशालिटी उपचार केंद्र

बोन-मॅरो ट्रान्सप्लांट हे सामान्यपणे ८ वर्ष वयोगटाच्या मुलांमध्ये केल्यास त्याचे परिणाम चांगले मिळतात.


मिळणार मोफत सुविधा

  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलांसाठी ही सुविधा मोफत असेल
  • आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत असलेल्या मुलांचा खर्च दानशूर संस्थांच्या मदतीतने उचलला जाईल
  • दारिद्र्य रेषेखाली न येणाऱ्या रुग्णाने आपल्या क्षमतेनुसार योग्य ती रक्कम जमा केल्यानंतर उर्वरित रक्कमेसाठी दानशूर संस्थांच्या मदतीतून उपचारांचा खर्च उचलला जाईल
  • बोन-मॅरो ट्रान्सप्लांटचा उपचार कालावधी साधारण एक महिन्याचा असतो. यानुसार या ट्रान्सप्लांटबाबत सुपरस्पेशालिटी केंद्रात वर्षभरात ६൦ ते ८൦ रुग्णांवर प्रत्यारोपण करणं सोपं जाईल.
  • सध्या मुंबईतील शीव आणि टाटा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध
  • या सुपरस्पेशालिटी उपचार केंद्रात सध्या थॅलेसेमिया, रक्तदोष, कर्करोग रुग्णांकरता १५ खाटा राखीव.
  • ८ खाटा बोन-मॅरो प्रत्यारोपणासाठी राखीव
  • ६ खाटा या केमोथेरपी उपचारांसाठी राखीव
  • महापालिकेच्या सुपरस्पेशालिटी उपचार केंद्रात लवकरच सुरू होणाऱ्या बोन-मॅरो प्रत्यारोपणासाठी सध्या १५ रुग्णांची नावं देखील नोंदवण्यात आली
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा