Advertisement

आई तुझा स्तनपानावर भरोसा नाय काय?, वाडिया रुग्णालयाकडून जनजागृती


आई तुझा स्तनपानावर भरोसा नाय काय?, वाडिया रुग्णालयाकडून जनजागृती
SHARES

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या परिचारिकांनी बहुचर्चित सोनू या गाण्याचा वापर करत स्तनपानाबाबत जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर आईचं दूध हे बाळासाठी सर्वात महत्त्वाचं असतं. पण, तरीही काही माता बाळाला स्तनपान देण्याचे टाळतात. ज्याचा परिणाम बाळ आणि आई अशा दोघांवरही होतो.

त्यामुळेच अशा मातांना स्तनपानाचा संदेश देण्यासाठी वाडिया रुग्णालयाने पुढाकार घेत स्तनपानाबाबत एक कार्यक्रम राबवला. या कार्यक्रमात रुग्णालयातील परिचारिकांनी स्तनपानाबाबत पोस्टर्स तयार करुन स्तनपान किती महत्त्वाचं आहे, याबाबत मातांना माहिती दिली.बाळाची प्रकृती स्थिर होण्यासाठी वैद्यकीय उपचारांप्रमाणेच आईचं दूधही आवश्यक असतं. स्तनांतून येणारं दूध प्रथिनांनी युक्त असतं. या दुधाने बाळात प्रतिकारक्षमता निर्माण होते. मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळाला दूध पाजणं आईला शक्य नसेल, तर त्यासाठी रुग्णालयांत दुग्ध बँकेची देखील सोय करण्यात आली आहे.

वाडियाच्या प्रसुतीगृहामध्ये १५० खाटा आहेत. तसंच, नवजात अतिदक्षता विभागात मुदतपूर्व प्रसूती झालेल्या जवळपास ११०० बाळांवर दरवर्षी उपचार करण्यात येतात.

या कार्यक्रमात ज्या मातांना स्तनपान देण्यात अडथळा येत होता, त्यांना प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे परिचारिकांनी तयार केलेल्या “आई तुझा स्तनपानावर भरोसा नाय काय” या गाण्यातून मातांचं प्रबाेधन करण्यात आलं.


अशी केली जनजागृती पहा -

https://www.youtube.com/watch?v=tPNZydXYAkw


वाडिया रुग्णालयातील दुग्ध बँकेत दरवर्षी ५०० लिटर दूध गोळा केलं जातं. मुदतपूर्व प्रसूती झालेल्या १५ ते २० बाळांना दर दिवशी या दुधाचा लाभ होतो. प्रत्येक नवजात बालकाला आईचं दूध दिलं जावं कारण त्याचे दीर्घकालीन लाभ त्याला मिळतात. बाळाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. ज्या माता आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाहीत, त्यांना या दुग्ध बँकेचा फायदा होतो. कुटुंबीयांकडून संमती घेतल्यानंतरच दात्यांनी दिलेलं दूध बाळांना पाजलं जातं.
डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया रुग्णालय

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) भारतात दर वर्षी १५ दशलक्ष बाळांची प्रसूती मुदतपूर्व होते. मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांना हाताळण्यासाठी सर्वच रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध होतात असं नाही. त्यामुळे २०१५ साली जवळपास १ दशलक्ष नवजात बालकांचा मृत्यू झाला.


दुग्ध बँकेत दूध साठवण्याची प्रक्रिया

दुग्ध बँक सेवेमध्ये प्रशिक्षित परिचारिका दूध काढतात, प्रक्रिया करतात, साठवणूक करतात आणि बाळांना ते दूध पाजतात. अतिरिक्त दूध शीतगृहात २-४ अंश सेल्सिअस तापमानात ३ दिवस ठेवण्यात येतं.

या कालावधीत दुधाची जीवाणू परीक्षा होते. त्यानंतर ते ६७ अंश सेल्सिअसला पाश्चराईझ करण्यात येतं. त्यानंतर ते दूध ८ अंश सेल्सिअस तापमानावर शीतगृहात साठवून ठेवण्यात येतं. अशा प्रकारे साठवून ठेवलेलं दूध १०० दिवस टिकून राहते.हे देखील वाचा -

पालिका रुग्णालयात लवकरच स्तनपानासाठी ‘हिरकणी कक्ष’?
Read this story in हिंदी
संबंधित विषय