Advertisement

कामा रुग्णालय ठरलं सर्वोत्कृष्ट रुग्णालय


कामा रुग्णालय ठरलं सर्वोत्कृष्ट रुग्णालय
SHARES

सीएसटीएमच्या कामा रुग्णालयाने मुंबईतील सर्वोकृष्ट रुग्णालयाचा मान पटकावला आहे. त्याचं कारण असं की, राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीचा वापर आतापर्यंत योग्य पद्धतीने केला आहे की नाही, हे तपासून पाहण्यासाठी मुंबईत ३५ आमदारांची एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीद्वारे मुंबईतील सरकारी आणि पालिका रुग्णालयांचं सर्वेक्षण करण्यात आलं. महिला आणि बाल कल्याण विभागांतर्गत आमदारांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. आमदार विद्या चव्हाण आणि भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर या समितीचे सदस्य आहेत.


सरकारी रुग्णालयामध्ये नंबर वन

या समितीने दिलेल्या निर्णयानुसार, मुंबईतील सरकारी रुग्णालयांपैकी कामा रुग्णालयाने सर्वोकृष्ट रुग्णालय असण्याचा मान पटकावला आहे. समितीने केलेल्या सर्वेक्षणात रुग्णालयाचा स्वच्छ परिसर, रुग्णांची नियमित देखभाल, स्वच्छ वॉर्ड आणि स्वयंपाकगृहात असलेली शिस्त, उपकरणे याची पाहणी करूनच मुंबईतील कामा रुग्णालयाला सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून प्रथम मान दिला आहे.


रुग्णालयांच्या सर्व्हेनंतर निर्णय

कमिटी सदस्य आमदार विद्या चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘महिला आणि बाल कल्याण विभागांतर्गत आमदारांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मुंबईतील सरकारी-पालिका रुग्णालयांचा सर्व्हे केला गेला. आम्ही ७ ते ८ रुग्णालये फिरलो. त्या पैकी एक कामा रुग्णालय होतं. २००८ साली कामा रुग्णालयात अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळची अवस्था आणि सध्याची कामा रुग्णालयाची परिस्थिती पाहता खूप चांगली सुधारणा पाहायला मिळाली. एकूणच महिलांसाठीची जी काही सुविधा या रुग्णालयात करण्यात आलेली आहे, ती अतिशय उत्तम आहे. आरोग्याच्या दृष्टीने उपकरणं देखील मोठ्या प्रमाणात या रुग्णालयात आणली गेली आहेत. त्यामुळे त्यांना मान देण्यात आला."

मी २०११ ला कामा रुग्णालयाचा कारभार स्विकारला. सर्वात आधी स्वच्छतेला आम्ही प्राधान्य दिलं. गेटची उंची वाढवली. रुग्णांना बरं वाटावं म्हणून वातावरण चांगलं ठेवण्यावर भर देण्यात आला. शिवाय, रुग्णांच्या काळजीच्या दृष्टीने अनेक उपकरणं आणली. १३१ वर्ष जुनं हे रुग्णालय आहे. या वास्तूची जपणूक चांगली ठेवण्यासाठी मंत्री गिरीष महाजन, सेक्रेटरी देशमुख, जे. जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांचं उत्तम मार्गदर्शन लाभलं.

डॉ. राजेश्री कटके, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय


महिलांसाठी विशेष सुविधा

शिवाय, २൦൦८ ला कामा रुग्णालयात अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी रुग्णालयाची परिस्थिती वेगळी होती. आता रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं उपलब्ध करण्यात आली. रुग्णालयात महिलांसाठी स्वतंत्र प्रसूतीगृह, सोनोग्राफी केंद्र, बाह्यरुग्ण विभाग तसंच कॅन्सर महिलांवर उपचार करण्यासाठी पॅप स्मिअर व मॅमोग्राफी चाचण्याही उपलब्ध केल्या असल्याचं डॉ. कटके यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं आहे.



हेही वाचा

जे.जे. रुग्णालयात कॅन्सर ओपीडी सुरू


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा