Advertisement

गर्भाशयातून निघाल्या ६५ गाठी, कामा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया


गर्भाशयातून निघाल्या ६५ गाठी, कामा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
SHARES

ओटीपोटात दुखणं, पाठ दुखणं किंवा मासिक पाळी दरम्यान अतिरक्तस्राव होत असल्यास या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. अशा समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा. कारण एका विवाहित महिलेला अशीच समस्या उद्भवली होती. त्यामुळे त्यांनी जेव्हा डॉक्टरांकडे तपासणी केली तेव्हा त्यांच्या गर्भाशयात तब्बल ६५ गाठी असल्याचं निष्पन्न झालं. सध्या कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून या गाठी काढत एक नवा विक्रम केल्याचा दावाही या रुग्णालयाद्वारे केला जात आहे.



२ वर्षांपासून होता त्रास

सायनमध्ये रहाणाऱ्या ४२ वर्षीय देवांगी पोयरेकर यांना गेली २ वर्षे ओटीपोट दुखण्याचा, मासिक पाळीत अति रक्तस्त्राव होण्याचा त्रास होता. अनेक उपचार करूनही निदान होत नव्हतं. कुठे गर्भाशयाची पिशवी काढायला सांगत होते, तर कुठे खर्चिक अशी टेस्ट ट्यूबचा सल्ला दिला जात होता आणि ते त्यांना परवडणारं नव्हतं. शेवटी त्यांनी कामा रुग्णलयात धाव घेतली आणि कायमस्वरुपी इलाज केला.


देवांगी या दोन वर्षांपासून फायब्रॉईडच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर आम्ही त्वरीत उपचार सुरू केले. त्यांच्या गर्भाशयात एक दोन नव्हे, तर तब्बल ६५ फायब्राईडच्या गाठी होत्या. ही शस्त्रक्रिया २.३० तास चालली. यातील सर्वात मोठी गाठ १५ सेंटीमीटरची होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भाशयाला धक्काही न लावता ही शस्त्रक्रिया केली.

- राजश्री कटके, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय


यासाठी मी अनेक डॉक्टरांची भेट घेतली. अखेर ३० नोव्हेंबरला कामा रुग्णालयात दाखल झाले. मला माहीत होतं की, मला फायब्रॉईडची समस्या आहे. मात्र त्यासाठी माझं गर्भाशय काढून टाकावं लागेल याची मला फार भीती होती. तरीही मी शस्त्रक्रियेसाठी तयार झाले.

- देवांगी पोयरेकर, रुग्ण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा