Advertisement

खाजगी रुग्णालयातील कोरोना लसीच्या किंमती ठरल्या, तिन्ही लस 'या' दरात मिळणार

केंद्र सरकारनं खासगी रुग्णालयांसाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि स्पुतनिक व्ही या लसींचे दर निश्चित केले आहेत. जाणून घ्या नव्या किंमती

खाजगी रुग्णालयातील कोरोना लसीच्या किंमती ठरल्या, तिन्ही लस 'या' दरात मिळणार
SHARES

केंद्र सरकारनं खासगी रुग्णालयांसाठी (Private hospital) कोव्हॅक्सिन (Covaxin), कोव्हिशिल्ड (Covishield) आणि स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लसींचे दर निश्चित केले आहेत. तसंच लसीवर ५ टक्के जीएसटी (GST) आकारण्याचा निर्णयही केंद्रानं घेतला घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खासगी रुग्णालयांसाठी लसीचे दर निश्चित केले आहेत. या निर्णयानुसार कोव्हिशिल्ड या लसीची किंमत प्रतिडोस ७८० रुपये एवढी असेल. तर कोव्हॅक्सिन या लसीचा दर हा प्रतिडोस १,४१० एवढा असेल. स्पुतनिक-V या लसीचा दर प्रतिडोस १ हजार १४५  रुपये एवढा असेल. हे सर्व दर हे खासगी रुग्णालयांसाठी असतील.

केंद्र सरकारनं कोरोना प्रधिबंधक लसीवर ५ टक्के GST आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सर्व लसींवर १५० रुपये प्रतिडोस सर्व्हिस चार्ज आकारण्याचेसुद्धा केंद्रानं ठरवले आहे.

येत्या २१ जूनपासून केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचे मोफत वाटप केले जाणार आहे. त्याआधी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं लसपुरवठा आणि लसीकरण पद्धतीविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं सध्या एकूण ७४ कोटी डोसेसाठी ऑर्डर दिलेली आहे. त्यामध्ये २५ कोटी कोव्हिशिल्ड, तर १९ कोटी कोव्हॅक्सिन लसीच्या डोसेसचा समावेश आहे.

त्याव्यतिरिक्त सरकारनं ई-बायोलॉजिकल लिमिटेडला ३० कोटी डोसेसची ऑर्डर दिली आहे. केंद्र सरकारनं या सर्व कंपन्यांना लसखरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी ३० टक्के रक्कम आधीच देऊ केली आहे.

दरम्यान, सध्याच्या नव्या गाईडलाईन्सनुसार एकूण लसींपैकी ७५ टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करणार आहे. तसंच या सर्व लसी राज्यांना मोफत दिल्या जातील.

दरम्यान, राज्यात मंगळवारी १० हजार ८९१ नवीन रुग्ण आढळले. तर १६ हजार ५७७ रूग्ण बरे झाले आहेत. तसंच २९५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५५,८०,९२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.३५ टक्के झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६९,०७,१८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,५२,८९१ (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,५३,१४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,६७,९२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.



हेही वाचा

दिव्यांगांकरिता नवी मुंबईत १० जूनला तीन रुग्णालयांत विशेष लसीकरण सत्र

मुंबईतील तीन कोविड सेंटर्स बंदच राहणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा